आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजदूताने छायाचित्राबाबत विश्वासघात केला : अमेरिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेम - इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये नव्यानेच उघडण्यात अालेल्या अमेरिकी दूतावासाने जेरुसलेमच्या छायाचित्राबाबत विश्वासघात झाल्याचे म्हटले अाहे. राजदूत डेव्हिड फ्राइडमन यांना पूर्वीच्या जेरुसलेमचे छायाचित्र प्राप्त करण्यास सांगण्यात अाले हाेते; परंतु तसे करण्यात अाले नाही. पूर्वीच्या छायाचित्रात अल-अक्सा मशीद मिटवण्यात अाली हाेती.


अतिरूढीवादी यहुदी वृत्त संकेतस्थळ ‘किकार हशब्बत’द्वारे मंगळवारी रात्री प्रकाशित केलेल्या एका छायाचित्रात मुस्लिम व यहुदींसाठी फ्लॅशपॉइंट जागेवर पवित्र इस्लामी धर्मस्थळ हे एका यहुदी धर्मस्थळाचे अनुकरण करून प्रतिस्थापित करण्यात अाल्याचे दिसून येत अाहे. या प्रकाराबाबत अमेरिकेने नाराजी व्यक्त केली अाहे.

 

याबाबत अमेरिकी दूतावासाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले अाहे की, तेल अवीवजवळ बेनी ब्रॅकमध्ये धर्मादाय संस्थेच्या भेटीदरम्यान त्यांच्या परवानगीविना फ्राइडमन यांच्यासमाेर छायाचित्राशी छेडछाड करण्यात अाली हाेती. या प्रकारामुळे चॅरिटी अचियाने माफी मागितली हाेती. या संस्थेच्या एका अधिकाऱ्याने फ्राइडमन यांना संबंधित छायाचित्र दिले हाेते. दरम्यान, इस्रायली वृत्तपत्रांत प्रकाशित एका खुलाशात संबंधित संस्थेने म्हटले अाहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांतील एका सदस्याने इतरांशी विचारविनिमय न करता स्वत:च्या जबाबदारीवर ते छायाचित्र सादर केले हाेते. फ्राइडमन हे यहुदी असून, इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बंॅकमध्ये यहुदींचे समर्थक अाहेत. त्यामुळे पॅलेस्टाइनमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत खराब अाहेत.

बातम्या आणखी आहेत...