आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे अमेरिकेतील मुस्लिम बहुल शहर, अशी आहे लोकांची LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील एकमेव मुस्लिम बहुल हॅमट्रॅक शहर - Divya Marathi
अमेरिकेतील एकमेव मुस्लिम बहुल हॅमट्रॅक शहर

इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प झाल्यापासून तेथील मुस्लिम दबकून आहेत. ट्रम्प सत्तेत येताच अमेरिकेतील मुस्लिमांना धमक्या मिळाल्या होत्या तर काही ठिकाणी मुस्लिमांवर हल्लेही झाले होते. ट्रम्प यांनी तर संपूर्ण अमेरिकेतच मुस्लिमांना बंदी घालण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील मुस्लिम कम्युनिटी भीतीच्या सावटाखाली आली होती. अमेरिकेतील एकमेव मुस्लिम बहुल हॅमट्रॅक शहरातही तीच स्थिती आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर तेथील लोकांनी भीती व्यक्त केली होती. महापौरानेच व्यक्त केली होती भीती....

 

- हॅमट्रॅक शहराचे महापौर कॅरन मजेव्स्की यांनी ट्रम्प यांच्या विजयानंतर फेसबुकवर एक शहरवासियांना खुले पत्र लिहत लेटर पोस्ट केले होते.
- त्यात त्यांनी म्हटले होते की, हे काही आता लपून राहिले नाही की तुमच्याप्रमाणेच राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत मी ट्रम्प यांना जोरदार विरोध केला होता.
- ट्रम्प सत्तेत आल्याने मी घाबरलो असून, या देशाचे आणि उर्वरित जगाचे काय होईल याची भीती सतावत आहे.

 

कधी होते पॉलिश कॅथोलिक शहर-

 

- न्यूज साईट डेलीमेलच्या माहितीनुसार, कधी काळी येथे 90 टक्के लोकसंख्या पॉलिश कॅथोलिक लोकांची होती.
- मात्र, बांगलादेश, येमेन आणि बोस्निया सारख्या मुस्लिम बहुल देशातील स्थंलातरित लोकांमुळे येथील मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढली.
- यामुळे आता या शहरात मुस्लिम लोकांची सत्ता आहे.

 

अनेक बाबींवर बंदी-

 

- कधी काळी हे शहर बियर पिण्यासाठी, पॅक्जी पेस्ट्रीज, पोप आणि डॉन्सिंगसाठी ओळखले जायचे. 
- आता येथे चार मशिदी आहेत व मशिदीच्या परिसरात दारू विकण्यास मनाई आहे.
- कॅरनच्या माहितीनुसार, या शहरात अनेक बाबींवर आजही बंदी आहे. एक इंटरटेनमेंट हब शहर अशी ओळख असलेल्या या शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.

 

अरब लोक सर्वात जास्त-

 

- सेन्ससच्या ताज्या आकडेवारीनुसार, या शहरात सर्वात जास्त अरबी लोक राहतात. या शहरात अरबी लोकांची 23 टक्के लोकसंख्या आहे. 
- दुस-या नंबरवर येथे 19 टक्के बांगलादेशी आहेत. रिपोर्टनुसार, 1930 च्या दशकात बांगलादेशातील अनेक लोक तेथे कामासाठी पोहचले होते.
- यानंतर बोस्निया आणि इतर मुस्लिम देशांतील 9 टक्के लोकसंख्या आहे. 
- 2010 च्या सेन्सस आकडेवारीनुसार, शहराची एकून लोकसंख्या 22, 423 होती. ऑफिशियली हॅमट्रॅक शहराला 'द वर्ल्ड विदीन टू स्क्वेयर माईल्स' नावाने ओळखले जाते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या शहरातील जीवनमानाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...