आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने कचरा कुंडीत टाकले, मुंग्यांनी खाल्ले नाक; आता अमेरिकेत अशी जगते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - गुजरातच्या अंजार येथे 3 वर्षांपूर्वी कचऱ्याच्या डब्यात एक चिमुकली सापडली होती. तिच्या नवजात शरीराला कीडे-मुग्या खात होते. मुंग्यांनी तिचे नाकही खाल्ले. कसे-बसे एका व्यक्तीचे लक्ष त्या कचराकुंडीकडे गेले आणि त्यानेच या चिमुकलीला रुगणालयात उपचारासाठी दाखल केले. हॉस्पिटलमध्ये तिला दुर्गा असे नाव देण्यात आले. माध्यमांनीही या मुलीचे वृत्त लावून धरले होते. अमेरिकेतील एका दांपत्याने तिला दत्तक घेऊन तिचे आयुष्यच बदलले आहे.

 

- गुजरातच्या कच्छ येथील एका शहरातील कचरा कुंडीत 4 वर्षांपूर्वी नवजात मुलगी सापडली होती. जन्मताच तिच्या आईने तिला कचरा कुंडीत टाकले होते. 
- एका सफाई कर्मचाऱ्यालाच ती कचराकुंडीत सापडली. त्यावेळी किडे-मुंग्यांनी तिचे नाक खाल्ले होते. तिला तातडीने रुगणालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. 
- या मुलीबाबतचे वृत्त पसरताच अनेक संस्था आणि संघटनांसह सामान्य लोक तिच्या मदतीसाठी पुढे आले. रुगणालयानेच तिचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर उपचार केले. 
- रुगणालय स्टाफनेच तिला दुर्गा असे नाव दिले होते. तिला महिनाभर भरती करून उपचार करावे लागले. यानंतर भुज येथील एका संस्थेकडे सुपूर्द केले.
- महिला कल्याण केंद्रात दुर्गा दोन वर्षे राहिली. यानंतर अमेरिकेतील पॉप सिंगर आणि शिक्षिका क्रिस्टीन विल्यम्सने तिला दत्तक घेतले. 
- क्रिस्टीन तिला घेऊन अमेरिकेत गेली. त्याच ठिकाणी तिच्या नाकाची सर्जरी केली. 
- अमेरिकेतील डॉक्टरांनी इतक्या चांगल्या प्रकारे तिची सर्जरी केली, की तिचे घाव आता लक्षातही येत नाहीत. यानंतर क्रिस्टीनसोबत ती टीव्हीवर अनेक चर्चा सत्र आणि कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहे. क्रिस्टीनने दुर्गा व्यतिरिक्त मुन्नी नावाच्या एका मुलीला देखील दत्तक घेतले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दुर्गाच्या लाइफचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...