आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीलंपट स्वभावामुळे बरबाद झाला Anti-Virus किंग, नशेत उडवले 600 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - मॅकफी अॅन्टिव्हायरस बनवणारा जॉन मॅकफी पुन्हा फरार झाला आहे. यावेळी अमेरिकेकडून जिवाला धोका असल्याचा आरोप त्याने लावला आहे. अॅन्टी व्हायरस किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन मॅकफीने एक सॉफ्टवेअर McAfee बनवून त्यातून 10 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात 700 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याने हे सॉफ्टवेअर इंटेलला विकले ज्याचे नाव आजही बदलले नाही. तेव्हापासूनच तो फक्त त्याच पैश्यांवर ऐश करत आहे. मात्र, पैसा, दारु, ड्रग्स आणि वेश्यांमध्ये त्याने आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आणि देशोधडीला लागला. आज 72 वर्षीय जॉन रेप आणि हत्येच्या आरोपांना सामोरे जात आहे. 


15 वर्षांचा असताना वडिलांचे निधन
जॉन मॅकफीचा जन्म 1945 मध्ये अमेरिकेच्या आर्मी बेस कॅम्पमध्ये झाला होता. जॉन फक्त 15 वर्षांचा होता जेव्हा त्याच्या व्यसनी वडिलांचा मृत्यू झाल्या. त्यांनी नशेत आत्महत्या केली होती. तेव्हापासूनच जॉन ड्रग्स घ्यायला लागला असे म्हटले जाते. 


ऑफिसमध्ये घेतले ड्रग्स
जॉन ड्रग्सच्या इतका आहारी गेला, की त्याने 1980 मध्ये आपल्या कार्यालयात सुद्धा ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये त्याला कोकेनची सवय लागली. आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा तो कोकेनचा पुरवठा करायचा असे आरोप आहेत. त्याचवेळी जगातील पहिले अॅन्टीव्हायरस आले आणि त्याने तो अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअर क्रॅक करण्याचे आव्हान स्वीकारले. 


असा बनला बिझनेस टायकून
1987 पर्यंत जॉन मॅकफी जगप्रसिद्ध अॅन्टी व्हायरस एक्सपर्ट बनला. तसेच स्वतःची कंपनी सुरू केली. मॅकफी एसोसिएट्स असे त्याच्या कंपनीचे नाव होते. McAfee अॅन्टी व्हायरसने जगभरात धूम ठोकली. जॉन आपल्या कंपनीकडून हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून देत होता. सॉफ्टवेअर मोफत द्या, कस्टमर केअरचे पैसे घ्या असे त्याच्या कंपनीचे धोरण होते. 1994 मध्ये मॅकफीने आपले सॉफ्टवेअर 6 कोटी अमेरिकन डॉलरमध्ये (300 कोटी रुपये) विकले. 


मग सुरू झाली प्लेबॉय लाइफस्टाइल
- इंटेलकडून अब्जावधी रुपये मिळाल्यानंतर मॅकफीने घरी बसून ऐश करण्यास सुरुवात केली. त्याने हवाई, अॅरीझोना, कोलरॅडो, न्यू मेक्सिको अशा विविध ठिकाणी आलीशान बंगले विकत घेतले. महिला फॅन्सची संख्या वाढली. त्याने सेक्स क्लब सुरू केले. तसेच विना परवाना मिनी एअरक्राफ्टची उड्डान घेतली. त्यामध्ये मॅकफीच्या पुतण्याचा मृत्यू झाला. 
- यानंतर तो ड्रग्सच्या इतक्या आहारी गेला, की आसपासच्या लोकांना सुद्धा ड्रग्सचे फायदे सांगून त्यांना ते ओढण्यास सांगायला लागला. 63 वर्षांचा असताना त्याने ऑनलाइन पोस्ट केली. त्यावर पोलिसांनी मॅकफीच्या घरावर धाड टाकली होती. पण, पुराव्यांच्या आभावी त्याची सुटका करण्यात आली. 
- कित्येक वर्षे त्याने बेलीझ येथे वास्तव्य केले. त्या ठिकाणी शेजाऱ्याचा मृतदेह आढळल्याने त्याच्या विरोधात हत्येचे आरोप लागले. त्यावेळी बेलीझ सरकारने आपल्याकडून पैसे मागितले. नकार दिल्याने हत्येचा खोटा आरोप लावला असा दावा त्याने केला होता. आता हाच मॅकफी वयाच्या 72 व्या वर्षी अमेरिकेवर आरोप लावून आपल्या सुरक्षा रक्षकांसह फरार झाला आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅकफीच्या लाइफस्टाइलचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...