आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ancient Mummy: इमारतीसाठी सुरू होते खोदकाम, आत जे सापडले पाहून सगळेच हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरो - इजिप्तच्या अलेक्झांड्रिया येथे जगातील सर्वात मोठे दगडी ताबूत सापडले आहे. एका बिल्डिंगच्या निर्मितीसाठी खोदकाम सुरू असताना अभियंत्यांना शवपेटीच्या आकाराचा दगड सापडला. यानंतर वेळीच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. हा एक दगडी ताबूत असून 2000 वर्षांपूर्वी तो दफन करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, या ताबूतमध्ये ज्या व्यक्तीचा ममी आहे त्याची उंची 8 फूट आहे असा दावा करण्यात आला आहे. जगात आतापर्यंत सापडलेले हे सर्वात मोठे ताबूत आहे. 


दफन केल्यानंतर कधीच उघडले नाही
- पुरातत्ववेदता डॉ. ऐमन एशमेवी यांनी सांगितल्याप्रमाणे, हा ताबूत पाहून तो एका शासकाचा ममी असल्याचे दिसून येत आहे. इ.स.पू. 322-330 च्या सुमारास पीटोलॅमिक शासन काळात हे दफन करण्यात आले असे सांगितले जात आहे.
- हे ताबूत काळ्या ग्रेनाइट दगडात कोरण्यात आले आहे. याची लांबी 8.6 फुट आणि रुंदी 5.5 फुट आहे. स्कॅनिंग केल्यानंतर असेही कळाले, की ताबूतच्या वरच्या भागाला जॉइंट करण्यात आले होते. अर्थात दफन केल्यानंतर ते कधीच उघडण्यात आले नाही. 


ताबूतजवळ सापडले असे काही...
कब्रीजवळ अल्बास्टर दगडांनी बनलेला 16 फूट लांब असा शिराचा स्टॅच्यु सापडला आहे. अल्बास्टर 'प्लास्टर ऑफ पॅरिस' चा एक प्रकार आहे. या व्यतिरिक्त कांस्यची भांडी, नक्शीकाम केलेली मातीची भांडी सापडली आहेत. सोबतच एक सोन्याचा कॉइन सुद्धा सापडला. त्यावर King Ptolemy III चा चेहरा कोरलेला आहे. King Ptolemy III इजिप्तच्या शेवटच्या शासक महाराणी क्लियोपॅट्राचे पूर्वज होते. परंतु, या ताबूतमध्ये ममी कुणाची आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

आणखी खुलासे होणार

इजिप्तच्या पुरातत्व मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, ताबूत उघडल्यानंतरच यावर निष्कर्श काढला जाऊ शकेल.या ठिकाणी आणखी काही वस्तू सापडल्या आहेत. त्यांचा खुलासा लवकरच केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...