आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदलामुळे बर्फ नरम रशियन जहाजाने आइस ब्रेकरशिवाय ओलांडला आर्क्टिक मार्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को-  रशियाच्या व्यावसायिक जहाजाने प्रथमच आइस ब्रेकरशिवाय थंडीच्या काळात आर्क्टिक समुद्र ओलांडला आहे. हा विक्रम एडवर्ड टॉल या लिक्विफाइड गॅस (एलएनजी) टँकरने केला आहे. ३०० मीटर लांब जहाजाने आर्क्टिक नॉर्दन सी रूटवर सुमारे ४८२८ किमी अंतर पार केले. हे जहाज डिसेंबरअखेर दक्षिण कोरियाच्या बंदरातून उत्तर रशियाच्या साबेटा टर्मिनलला गेले होते. या महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्सच्या माँटेयर बंदरात पोहोचले. त्याचा व्हिडिओ कंपनीने आता जारी केला आहे. जहाजाने फ्रान्सला गॅसचा पुरवठा केला. टिकाय या जहाज कंपनीने म्हटले आहे की, हे मोठे यश आहे. पहिल्यांदाच जहाजाने थंडीत रस्ता बनवला. तोही आइस ब्रेकरच्या मदतीशिवाय. हवामान शास्त्रज्ञांच्या मतानुसार, हा हवामान बदलाचा सकारात्मक परिणाम आहे कारण आर्क्टिकचा बर्फ आता पूर्वीएवढा कडक राहिला नाही.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जहाजाने १.८ मीटर बर्फाचा थर कापला....

बातम्या आणखी आहेत...