आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Army Foils Infiltration Bid In Keran Sector Of Kupwara District News And Updates

जम्मू-कश्मिरात घुसखोरीचा कट उधळला 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - रविवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घुसखोरीच्या उद्देशाने आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. 


लष्कराच्या अधिकाऱ्याने म्हटले की, दहशतवाद्यांनी कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी मारले गेले. शनिवारी बांदीपोराच्या पनार भागातील जंगलांत काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. कारवाईदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. 


भूसुरुंग स्फोटात दोन जवान जखमी

पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने लष्काराचे दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सब्झियांतील कनारी चौकीवर शनिवारी जवान बांधकाम करत होते. याच वेळी भूसुरुंंग स्फोट झाला आणि दोघे जखमी झाले. नियंत्रण रेषेवर घुसखोरी रोखण्यासाठी भुसुरूंग पेरण्यात येतात.

 

अमरनाथ यात्रा

जम्मू-काश्मिर पोलिसांनी २२ हजार अतिरिक्त जवांनाची केली मागणी - अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी निमलष्करी दलातील २२ हजार ५०० अतिरिक्त जवानांची मागणी जम्मू-काश्मिर पोलिसांकडून करण्यात आली आहे. यंदा अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी ४० हजार जवानांना तैनात केले जाणार आहे. मागील वेळी ३५ हजार जवान तैनात करण्यात आले होते. २८ जूनपासून सुरू होणाऱ्या यात्रेच्या सुरक्षेसाठी विविध स्तरावर तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा यात्रेकरूंवर उपग्रहाद्वारे नजर ठेवण्यात येईल. यात्रा मार्गावर जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. 


‘की-पॅड जिहादीं’वर आवर घालण्यासाठी गृह मंत्रालयाची आज बैठक : ‘की-पॅड’ जिहादींद्वारे विविध सोशल नेटवर्किंग साइटवर प्रकाशित करण्यात आलेली भडकाऊ माहिती काढून टाकण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयात सोमवारी एक बैठक होणार आहे. केंद्रीय गृह सचिव राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, दूरसंचार विभाग, सुरक्षा संस्था आणि जम्मू-काश्मिरमधील मोठे अधिकारी भाग घेतील. सोशल साइटवरून भडकावणारे साहित्य हटवण्यासह कायदेशीर कारवाई करण्यासाठी या बैठकीत मंथन होईल.

बातम्या आणखी आहेत...