आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Audi चे सीईओ रुपर्ट स्टॅडलर यांना अटक, Dieselgate स्कँडल प्रकरणी कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्युनिक - जगप्रसिद्ध लग्जरी कार कंपनी Audi चे सीईओ रुपर्ट स्टॅडलर यांना जर्मनीत अटक करण्यात आली आहे. डीझेलगेट स्कँडल प्रकरणी त्यांच्या विरोधात सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या स्कँडलमध्ये पुरावे नष्ट करण्याचा ते प्रयत्न करू शकतात अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. 2015 मध्ये सर्वप्रथम समोर आलेल्या डीझेलगेट प्रकरणात कंपनी विरोधात चौकशी सुरू होती. त्यानंतर अटक झालेले रुपर्ट सर्वात मोठे अधिकारी आहेत. या वृत्तानंतर ऑडीची पॅरेंट कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen)चे शेअर 2 टक्क्यांनी घसरले आहेत.


ऑडीची पॅरेंट कंपनी फोक्स वॅगनचे प्रवक्ते निकोलाई लॉड यांनी अटकेच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे. पण, यासंदर्भात त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. कंपनीचे वरिष्ठ मंडळ यासंदर्भात एक मीटिंग घेऊन चर्चा करतील. यानंतर अधिकृत प्रतिक्रिया दिली जाणार आहे. 

 

काय आहे प्रकरण...?
- स्टॅडलर यांच्या म्युनिक येथील घरात गेल्या वर्षभरापासून संभावित पुराव्यांची चौकशी केली जात होती. स्टॅडलर यांच्यावर पोलिस आणि प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून होते अशी माहिती गेल्या आठवड्यातच जाहीर करण्यात आली होती. 
- विशेष म्हणजे, जर्मनी सरकारने या प्रकरणात फोक्सवॅगन कंपनीवर 120 कोटी अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला. या कंपनीने आपल्या ऑडी कारमध्ये लावलेल्या डीझेल इंजिनची माहिती देताना ग्राहकांची दिशाभूल केली असे सरकारने म्हटले.
- फोक्सवॅगनने सर्वप्रथम 2015 मध्ये ऑडीचे डीझेल इंजिन तयार करताना कोट्यवधींचा घोटाळा केल्याची कबुली दिली होती. आपल्या वाहनाच्या इंजिनची एमिशन टेस्ट घेताना त्यांनी आकडेवारीत फेरफार केल्याचे मान्य केले होते. 


नेमके काय केले होते?
- फोक्सवॅगन आणि ऑडी यांनी आपल्या कारमधून निघणाऱ्या कार्बन आणि इतर घातक वायू उत्सर्जनाच्या मोजमापात घोळ केला होता. त्यांनी एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर तयार केले होते. 
- कारमधून उत्सर्जन अधिक असला तरीही चाचणीच्या वेळी त्या सॉफ्टवेअरमध्ये आकडेवारीत फेरफार करण्यात आली. उत्सर्जन मुद्दाम कमी असल्याचे आणि कार पर्यावरणाशी सुसंगत असल्याचा दावा करण्यात आला. असे करून त्यांनी जर्मनीसह जगभरातील पर्यावरण नियमांची अवहेलना केली. 


आतापर्यंत 30 कोटी अमेरिकन डॉलरचा फटका
- हे स्कँडल समोर येताच कंपनीचे शेअर घसरले. ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला. विविध देशांमध्ये विविध प्रकारचे दंड आणि कार परत बोलावून बदलून देणे असे करत असताना कंपनीला 30 अब्ज अमेरिकन डॉलरचा फटका बसला आहे. 
- फोक्सवॅगनचे माजी सीईओ मार्टिन विंटनकॉर्न यांनी आधीच राजीनामा दिला. त्यांच्यावर सुद्धा अमेरिकेच्या वकिलांनी कोर्टात खटला दाखल केला आहे. त्यांनी वायर फ्रॉड करून या घोटाळ्याचा कट शिजवला होता आणि अमेरिकेतील नियम मोडले असा आरोप लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...