आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात Apple ला 45 कोटींचा दंड, प्रॉडक्ट रिपेअर करण्यास दिला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा - ऑस्ट्रेलियातील कोर्टाने अॅपल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला तब्बल 66 लाख डॉलरचा (45 कोटी रुपयांचा) दंड ठोठावला आहे. अॅपलने आपल्या ग्राहकांची दिशाभूल केल्या प्रकरणी हा निकाल देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन कॉम्पेटीशन अॅन्ड कंझ्युमर्स कमिशनने शेकडो उपभोगत्यांच्या तक्रारींवर हे प्रकरण न्यायालयात पाठवले होते. तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2015 आणि फेब्रुवारी 2016 मध्ये खरेदी केलेले iPhone आणि iPad मध्ये अनेक प्रकारच्या समस्या उदभवल्या होत्या. परंतु, कंपनीने ते दुरुस्त करण्यास नकार दिला. कंपनीने सुद्धा आपल्यावर लावलेल्या आरोपांची कबुली दिली. 


प्रॉडक्ट बिघडल्यास ग्राहकांना दुरुस्तीचा अधिकार -कोर्ट
कोर्टाने दिलेल्या निकालानुसार, "ग्राहक किंवा उपभोगत्याने एखादी वस्तू किंवा प्रॉडक्ट खरेदी केल्यास आणि त्यात काही बिघाड झाल्यास ते दुरुस्त करून घेण्याचा त्यांना कायदेशीर अधिकार आहे. काही प्रकरणांमध्ये कंपन्यांना प्रॉडक्ट बिघडल्यास खरेदीसाठी मोजलेले पैसे सुद्धा परत द्यावे लागतात."


काय होता अॅपलचा युक्तीवाद?
अॅपलने वर्षभरात ज्या ग्राहकांना त्याचे आयफोन आणि आयपॅड दुरुस्त करण्यास नकार दिला त्याचे कारण सुद्धा दिले होते. आपण त्यांना दुरुस्ती करून देण्यास नकार दिला हे कंपनीने मान्य केले. परंतु, त्या सर्वांनी आपले उपकरण थर्ड पार्टीकडून दुरुस्तीसाठी उघडले होते. ते थेट आमच्याकडे न जाता दुसऱ्यांकडे गेले. त्यामुळे, त्यांना प्रॉडक्ट रिपेअर करून मिळणार नाही असे कंपनीच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले होते. परंतु, कोर्टाने अॅपलचा हा युक्तीवाद फेटाळून लावला.


दंडाची रक्कम ग्राहकांना देण्यास सुरुवात
एका स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार, एकूणच 275 ग्राहकांनी अॅपल विरोधात हा खटला लढला होता. त्या सर्वांनी एरर 53 आल्याची तक्रार केली होती. काहींना अॅपलने एक अपडेट डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर काहींच्या समस्या सुटल्या परंतु, बहुतांश ग्राहकांना प्रॉब्लेम तसाच असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोर्टाच्या निकालानंतर पीडित ग्राहकांना दंडाची रक्कम वाटण्यास सुरुवात झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...