आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

77 वर्षीय म्हाताऱ्यासोबत 16 वर्षीय मुलीचा विवाह, आईने लावले गंभीर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मस्कत - हैदराबादच्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह अरब राष्ट्र ओमानच्या एका 77 वर्षीय म्हाताऱ्यासोबत लावण्यात आला आहे. मस्कत येथील भारतीय दूतावास अधिकारी त्या मुलीच्या सुटकेचे प्रयत्न करत आहेत. पण, अधिकाऱ्यांना तिची सुटका कठिण वाटत आहे. कारण, ते ज्या मुलीची सुटका करू पाहत आहेत, तिनेच आपण या लग्नात खुश असून ओमानलाच राहणार असे म्हटले आहे. ओमानी नागरिकाचा आणि त्या मुलीचा विवाह गतवर्षी मे महिन्यात झाला होता. त्याचवेळी तो या मुलीला आपल्यासोबत ओमानला घेऊन गेला. पण, लग्नाच्या तीन महिन्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हा प्रकार समोर आला. 

 

मुलीची प्रत्यक्ष भेट घेणार अधिकारी
- भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी ओमानच्या अधिकाऱ्यांशी या मुलीच्या भारत परतण्यासंदर्भात चर्चा केली होती. यानंतर त्या मुलीने लेखी जबाबात म्हटले आहे, की ती आपल्या पतीसोबत खुश आहे. तसेच भारतात येऊ इच्छित नाही. तिला ओमानमध्येच राहायचे आहे. अशा परिस्थितीत तिची सुटका शक्य नाही असे दूतावास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 
- दूतावासाच्या या विधानावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. एक 16 वर्षांची मुलगी एका 77 वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत खुश कशी राहू शकते. ती एक लहान मुलगी आहे. दूतावास पत्राला गृहित धरून असे कसे बोलू शकतो अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. यानंतर दूतावासाने कुठल्याही प्रकारच्या पत्रावर विश्वास न करता थेट त्या मुलीशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. 


5 लाखात विकले...
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हैदराबादच्या फलकनुमा पोलिस स्टेशनमध्ये मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये आईने आपला पती, नणद आणि नातेवाइकाला आरोपी केले आहे. त्या सर्वांनी मिळून या 16 वर्षीय मुलीचा 5 लाखात सौदा केला. त्या मुलीला यासंदर्भात काहीच माहिती नाही. यानंतर पोलिसांनी त्या मुलीचा बाप, आत्या आणि एका नातेवाइकाला अटक केली. मुलीच्या आईने सांगितल्याप्रमाणे, तिला त्या मुलीने ओमानमधून फोनवर संवाद साधला. तसेच आपला पती शारीरिक आणि मानसिक छळ करतो असे आरोप केले. 


मोठ्या रॅकेटचा भांडाफोड
या प्रकरणात पोलिसांनी मुलींची अरब देशांमध्ये विक्री करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला. तसेच त्यांच्या तावडीतून 12 अल्पवयीन मुलींची सुटका देखील करून घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 20 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 8 आरोपी अरब देशांचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...