आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Heart Attack, Cardiac Arrest मध्ये करू नका गल्लत, विमा कंपनीने दावा फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - हृदय विकारांच्या बाबतीत आजही भारतासह अनेक देशांच्या नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. काहींना हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अॅरेस्ट एकच वाटतात. पण, ही गल्लत आपले किती मोठे नुकसान करू शकते याचा सर्वात वाइट अनुभव ब्रिटनच्या स्टीव्हन हडलसन (40) आणि त्यांच्या पत्नी विकी हडलसन यांना आला आहे. तीन मुला-मुलींचे वडील स्टीव्हन यांची हृदयक्रिया अचानक बंद पडली. सुदैवाने पत्नी नर्स असल्याने तिने रुग्णवाहिका आणि डॉक्टर आल्यापर्यंत आपल्या पतीला जिवंत ठेवले. यानंतर उपचारावर मोठा खर्च झाला आणि स्टीव्हन यांचा जीव वाचला. त्यांनी ब्रिटनची सर्वात मोठी विमा कंपनी Aviva कडून आरोग्य विमा उतरवला होता. परंतु, त्यांचे हृदय कार्डिअॅक अॅरेस्टने बंद पडले होते, हार्ट अटॅकने नाही असे म्हणत कंपनीने आरोग्य विमाचा दावा नाकारला. 


या आरोग्य विमा कंपनीने आपल्या अटी शर्तींमध्ये हार्ट अटॅकचा उल्लेख केला होता. पण, कार्डिअॅक अॅरेस्टचा दावा मान्य केला जाणार नाही असे लिहिले होते. पण, विमा उतरवताना ही बारीकशी ओळ या कपलने वाचलेली नव्हती. त्यामुळेच त्यांना हा फटका बसला आहे.


16 वर्षांपासून नियमित भरत होते हप्ते...
> स्टीव्हन आणि त्यांची पत्नी विकी खासगी नोकरी करतात. पहाट उजळण्यापूर्वी 4 वाजता स्टीव्हन छातीत तीव्र वेदना होत असल्याचे सांगत झोपेतून उठले. त्यांचे हृदय बंद पडले होते. एक नर्स असल्याने पत्नी विकीने वेळीच प्रथमोपचार सुरू केला आणि डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत पतीला जिवंत ठेवले.
> डॉक्टरांनी स्टीव्हनला वेळीच आयसीयूत दाखल करून उपचार सुरू केले. त्यांची अवस्था खूप विकट होती हृदय 20 मिनिटे थांबले होते. या दरम्यान डॉक्टरांना स्टीव्हनचे हृदय पुन्हा सक्रीय करण्यासाठी डिफिब्रिलेटर्सचे 4 झटके देण्यात आले. थांबलेल्या किंवा अस्थिर हृदयगतीला सुरळीत करण्यासाठी एक छोटेसे कृत्रिम उपकरण म्हणजेच Defibrillator होत. ते रुग्णांच्या शरारीत इंप्लांट सुद्धा केले जाऊ शकतात. स्टीव्हनच्या हृदयात त्यापैकी एक कायमचे लावण्यात आले.
> जीव तर वाचला, परंतु पैसा पाण्यासारखा खर्च झाला. स्टीव्हनला 6 महिने घरातून बाहेरही पडता आले नाही. परिणामी नोकरी सोडावी लागली. पतीचा काळजी घेण्यासाठी विकीने सुद्धा फुल टाइम जॉब पार्ट करण्यास सुरुवात केली. घरात एकूण उत्पन्न 80 टक्क्यांनी कमी झाले. तेव्हा आपण आरोग्य विमा उतरवला होता असे लक्षात आले.
> स्टीव्हन यांनी ब्रिटनची सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी अविवा हेल्थ इंश्योरंसकडून लाखोंचा विमा उतरवला होता. गेल्या 16 वर्षांपासून ते नियमितपणे आरोग्य विमाचे हप्ते भरत होते. 16 वर्षांत त्यांनी जवळपास 4 लाख रुपये भरले होते. दाव्यानुसार त्यांना 60 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु, विमा कंपनीने त्यांचा Claim फेटाळून लावला. 


काय म्हणाले कंपनीचे अधिकारी?
> ब्रिटिश मीडिया मनी मेलच्या वृत्तानुसार, विमा कंपनीने दावा फेटाळून लावताना आपली बाजू मांडली आहे. "स्टीव्हन यांनी विमा उतरवला तेव्हा त्यांच्या अटी शर्तींमध्ये हृदय विकारांसंदर्भात हार्ट अटॅकचा उल्लेख होता. परंतु, त्यामध्ये कार्डिअॅक अॅरेस्टला विमा दिला जाणार नाही असे सांगण्यात आले होते. स्टीव्हन यांना हार्ट अॅट नव्हे, तर कार्डिअॅक अॅरेस्ट झाला होता. जे त्यांच्या वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी सुद्धा मान्य केले."
> "हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अॅरेस्टमध्ये मोठा फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाचे एखादे स्नायू मृत पावते. हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा होत नाही. छातीत तीव्र प्रकारच्या वेदना होतात. तसेच हृदयाचे ठोके अचानक अनियमित होतात. स्टीव्हन यांच्या बाबतीत तसे घडले नव्हते." 
> "स्टीव्हन यांच्या हृदयाच्या इलेक्ट्रिक सिस्टिममध्ये बिघाड आला होता. त्यामुळेच त्यांची स्पंदने थांबली होती. हा एक कार्डिअॅक अॅरेस्टचा प्रकार आहे, हार्ट अटॅकचा नाही. त्यामुळे स्टीव्हन यांना आम्ही विम्याची रक्कम देऊ शकणार नाही." असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 


2013 मध्ये केला नियमांत बदल...
स्टीव्हन यांनी 16 वर्षांपूर्वी हा विमा काढला होता. त्यामध्ये कार्डिअॅक अॅरेस्टसाठी क्लेम मान्य करणार नाही असे सांगण्यात आले होते. परंतु, 2013 मध्ये कंपनीने आपल्या अटी-शर्तींमध्ये सुधारणा केली. तसेच कार्डिअॅक अॅरेस्टसाठी देखील विमा दावे स्वीकारणार असे सांगितले. स्टीव्हन यांनी 2013 नंतर विमा काढला असता तर त्यांना विम्याची पूर्ण रक्कम मिळाली असती. 


पगार, खर्च देण्याची तयारी...
मीडियाने या प्रकरणात दखल घेतल्यानंतर अविवा हेल्थ इंश्योरंस कंपनीने आपल्या ग्राहकाची काही मदत करण्यास होकार दिला. स्टीव्हनला नोकरी गमवावी लागली. त्याच्या आरोग्य अहवालांवर कंपनी नजर ठेवून आहे. तसेच नोकरी गमावल्यानंतर नाही मिळालेला आतापर्यंतचा पगार आणि उपचारानंतरचा खर्च देण्यास कंपनी तयार झाली आहे. पण, संपूर्ण विम्याची रक्कम देता येणार नाही असा पुनरुच्चार केला.

 

बातम्या आणखी आहेत...