आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम यांच्या भेटी ट्रम्प यांची सर्वात मोठी चूक, गुप्तचर यंत्रणांचेही धाबे दणाणले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीत सर्वांचे लक्ष त्यांच्या हॅन्डशेक आणि स्माइलवर होते. परंतु, क्वचितच लोकांनी पाहिले असेल की ट्रम्प यांच्या हातून एक खूप मोठी चूक घडली आहे. ती म्हणजे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात सुरक्षित कार म्हणूनही ओळखल्या जाणारी आपली कार The Beast आपल्या नवीन मित्राला दाखवली. ही कार केवळ बाहेरूनच नव्हे, तर दार उघडून दाखवण्यात आली. ट्रम्प आणि किम जगातील सर्वात कट्टर शत्रू देशांचे नेते आहेत. त्यांची मित्र म्हणून ही पहिलीच भेट होती. तरीही ट्रम्प यांनी किमला आपले वाहन दाखवून एक मोठी चूक केली. कारचे दार उघडताच किम यांच्या चेहऱ्यावर आलेले हास्य सर्व काही सांगत होते. 

 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कुठलाही कार्यक्रम पूर्णपणे नियोजित आणि निर्धारित असतो. त्याबाहेर जाऊन राष्ट्राध्यक्ष काहीच करत नाहीत. उदाहणार्थ, एखाद्या परदेशी नेत्याची भेट घेतल्यानंतर किती वेळ थांबणार किंवा किती वेळ हॅन्डशेक करणार आणि कोणत्या दिशेने येणार यापासून कोणत्या दिशेने तेथून निघणार सर्व काही लिखित असते. परंतु, ट्रम्प यांनी किम यांना आपली कार दाखवली तो शेड्युलचा भाग नव्हता. त्यामुळे, सीक्रेट सर्विस एजंट्सची सुद्धा तारांबळ उडाली. त्यांना तातडीने कारकडे धाव घ्यावी लागली. तसेच तेथे थांबलेल्या कॅमरापर्सनला बाजूला सारावे लागले. 


जगातील सर्वात मजबूत कार 'The Beast'
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी कार वापरतात त्याला द बीस्ट असे म्हटले जाते. या कारची बॉडी, स्टील, अलुमिनियम आणि कार्बन फायबरसह टायटेनियमच्या सुनियोजित मिश्रणाने तयार केलेली आहे. यावर कुठल्याही बंदूक किंवा बॉम्बचा सुद्धा काहीच परिणाम होत नाही. एवढेच नव्हे, तर केमिकल अटॅक झाल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष सुरक्षित असतात. 
- या कारचा चालक हा सामान्य ड्रायव्हर नसून एक प्रशिक्षित सीक्रेट सर्विस एजंट आहे. तो कुठल्याही परिस्थितीत अतिशय चांगल्या प्रकारे कार चालवू शकतो. गरज पडल्यास 180 अंश सेल्सियसमध्ये कार टर्न करू शकतो. हल्ला झाल्यास हायस्पीड कार बाहेर काढणे त्याच्या डाव्या हाताचे काम आहे. 
- कारचे टायर पंक्चर रेसिस्टंट आहेत. ते कधीही पंक्चर होत नाहीत. मोठ्या हल्ल्यात कुणी बॉम्बने टायर उद्ध्वस्त केले तरीही कार त्याच गतीने यशस्वीरीत्या तेथून निघू शकते अशी त्याची रचना करण्यात आली आहे. 
- कारच्या फ्यूल टँकवर थेट बंदूकीने किंवा बॉम्ब हल्ला केला तरीही त्यात स्फोट होत नाही. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे गुप्त जेल लावण्यात आले आहे. त्यामुळे, कारच्या इंधन टँकला आग लागू शकत नाही. स्फोट होणे तर दूरचाच प्रश्न राहील.
- कारमध्ये आग विझवण्याची उपकरणे, टिअर गॅस आणि इतर सुरक्षा साहित्ये उपलब्ध आहेत. कारच्या काचांवर हल्ला झाल्यास किंवा दृश्यता कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यातूनही निघून जाण्याची व्यवस्था आहे. आंधारात कारचे हेडलाइट फोडल्यानंतरही समोर एक कॅमेरा आहे ज्यात नाइट व्हिजनची व्यवस्था आहे. हा कॅमेरा आतमध्ये ड्रायव्हरसमोर असलेल्या स्क्रीनवर चित्र प्रोजेक्ट करतो.
- या सर्व यंत्रणा तोडून कुणी कारच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याला ठार मारण्यासाठी कारच्या दारांमध्ये अॅसॉल्ट रायफल, शॉटगन, टिअर बॉम्ब आणि इतर अवजारे सुद्धा लपवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...