आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाच्या नरसंहारानंतर बशर असाद यांची युद्धगुन्ह्याची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- आपल्या जनतेच्या विरोधात हिंसक कारवाई करून प्रचंड नरसंहार घडवण्यात आल्याची कबुली सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी अगोदरच दिली आहे. त्यासाठी रशियाची मदत घेऊन हवाई हल्ले करण्यात आल्याचे असाद यांनी मान्य केल्याचा दावा ‘व्हाइट हाऊस’ने शुक्रवारी केला आहे.  


सिरियातील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. असाद सैन्याने देशातील बंडखोरांच्या अड््ड्यांना लक्ष्य करताना नागरी वस्तीवर बाॅम्ब वर्षाव केला. ही कारवाई अद्यापही सुरूच आहे. पाच दिवसांपासूनही सिरियात हिंसाचार सुरू आहे. या कारवाईतून असाद यांनी युद्धगुन्ह्याची एकप्रकारे कबुलीच दिली आहे. खरे तर त्यांनी जनतेच्या विरोधात यापूर्वी विषारी वायूच्या शस्त्रांचा वापर करून आपण युद्धगुन्हेगार असल्याचे अगोदरच सिद्ध केले होते.  


रशियाच्या संगनमताने असाद सैन्याने जनतेवर अमानुषपणे कारवाई सुरूच ठेवली. ही कारवाई तत्काळ बंद झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. परंतु असाद सरकार आणि रशिया यांची कारवाई थांबेल, असे दिसत नाही, अशा शब्दांत व्हाईट हाऊसचे उपप्रसिद्धी प्रमुख राज शहा यांनी सांगितले.  


स्थलांतरासाठीही वेळ नाकारला 

बंडखोरांना ठार करण्याच्या नावाखाली पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात सामान्य सिरियन नागरिक होरपळला आहे. त्यांना युद्ध छेडलेल्या ठिकाणाहून इतरत्र स्थलांतरित होण्यासाठी देखील वेळ नाकारण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेत ३० दिवसांचा अवधी मागण्यासंदर्भात काहीही करार झालेला नाही, असे गुरुवारी रशियाने स्पष्ट केले. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.  

 

रशियाही तितकेच जबाबदार  
सिरियातील हिंसाचारामागे असाद सरकार जबाबदार आहे. मात्र रशिया आणि इराणचीही असाद सरकारला फूस आहे. त्यामुळे सिरियातील हिंसाचारात रशिया देखील तितकेच जबाबदार आहे,  हे लक्षात घेतले पाहिजे, असा आरोप परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिदर नॉर्ट यांनी अन्य एका पत्रकार परिषदेतून केला.  

बातम्या आणखी आहेत...