आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्जियममध्ये Terror Attack; 2 पोलिसांसह एका नागरिकाचा मृत्यू, हल्लेखोर ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीज - बेल्जियमच्या लीज शहरात एका हल्लेखोराने गोळीबार करत 2 पोलिस अधिकारी आणि एक सामान्य नागरिकाला ठार मारले. त्याने शाळेतील एका महिला स्वच्छता कर्मचारीला वेठीस धरले होते. त्यानंतर पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरील पोलिसांना हल्लेखोराला ठार मारले. बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हल्ल्यातील पीडितांविषयी सांत्वणा व्यक्त केली. 


तुरुंगातून सुटल्याच्या दुसऱ्याच दिवशी हल्ला...
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराची ओळख किंवा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु, हल्ल्याच्या वेळी तो 'अल्लाहू अकबर' (अल्लाह महान आहे -अरबी भाषेत) अशा घोषणा देत होता. त्याने जवळच्याच शाळेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिस आले तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. 
- या गोळीबारात 2 पोलिस अधिकाऱ्यांचा आणि एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. तसेच आणखी दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरच चकमकीत हल्लेखोराला ठार मारले आहे. 
- बेल्जियमच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर सोमवारीच तुरुंगातून सुटला होता. त्याने दुसऱ्याच दिवशी लीज शहरात गोळीबार केला. सोशल मीडियावर घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 


2016 मध्ये झाला होता आयसिसचा हल्ला
बेल्जियममध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 2016 मध्ये झाला होता. तेव्हा दहशतवाद्यांनी कथितरित्या अरबी भाषेत अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या. या हल्ल्यांमध्ये 32 जणांचा मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे, मंगळवारच्या हल्ल्यानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...