आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका झटक्यात बुडाले अमिताभ बच्चन यांचे 650 कोटी रुपये, जाणून घ्या असे झाले नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / न्यूयॉर्क - बिटकॉइनला आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना 910 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, एका झटक्यातच त्याचे 650 कोटी रुपये बुडाले आहेत. क्रिप्टोकरंसीजच्या (बिटकॉइन) मार्केटमध्ये एक अनोळखी कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये सीनियर बच्चन यांचे शेअर आहेत. 


असे बुडाले 650 कोटील रुपये
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून भारताच्या छोट्याशा लिस्टेट कंपनी स्टॅम्पेडचे शेअरहोल्डर आहेत. या कंपनीच्या प्रोमोटरने नुकतेच अमेरिकेत एक कंपनी लॉन्गफिनला लिस्ट केले आहे. ज्यांचे स्टॉक दोनच दिवसांत तब्बल 2500 टक्के तेजीवर पोहोचले. अमेरिकेच्या या कंपनीने नुकतेच सिंगापूरची कंपनी जिड्डू डॉट कॉमचे अधिग्रहण (टेक ओव्हर) केले आहे. त्यामध्ये बच्चन यांची अप्रत्यक्ष होल्डिंग होती. या डील्स आणि क्रॉस होल्डिंग्समुळे एकाच झटक्यात बिग बींच्या शेअर्सची किंमत 910 कोटी रुपये झाली होती. आता ती फक्त 260 कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे. 

 

बिटकॉइनशी जुडलेय बच्चन यांचे लिंक
भारतासह जगभरात बिटकॉइन आणि इतर व्हर्चुअल चलनाची चर्चा सुरू असतानाच अमिताभ बच्चन कदाचित देशातील पहिली मोठी सेलिब्रिटी आहे जिने आपले नाव बिटकॉइनशी जोडले आहे. त्यांनी 3-4 वर्षांपूर्वी छोटीशी गुंतवणूक करून आपले नाव या व्हर्चुअल करन्सीशी लिंक केले होते. याचे लिंक हैदराबादची एक कंपनी स्टॅम्पेड कॅपिटल आहे. जी स्वतः रिसर्चशी संबंधित ग्लोबल ट्रेड हाऊस आणि 'लिक्विडिटी उपलब्ध करून देणारी आणि मार्केट मेकिंग कंपनी आहे. 

 

या कंपन्यांत शेअरहोल्डर आहेत बिग बी
- पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये बच्चन यांनी स्वतःला 'इंडिविजुअल नॉन प्रोमोटर शेअरहोल्डर' म्हटले आहे. त्यांच्याकडे 2.38 टक्के भागिदारी आहे. 
- बीएसईच्या आकडेवारीनुसार, बच्चन किमान जून 2014 पासून शेअरहोल्डर्स (1 टक्क्याहून अधिक भागिदारी) च्या यादीत आहेत. त्यांची ही भागिदारी वेळ परतवे बदलली आहे. 30 जून 2014 पर्यंत कंपनीत बच्चन यांचा वाटा 3.39 टक्के होता, ज्याची व्हॅल्यू 9 कोटी रुपये होती. त्यांची सध्याची होल्डिंग व्हॅल्यू 4.7 कोटी आहे. 


अमेरिकेत कंपनी असल्याचा फायदा
- बच्चन यांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण स्टॅम्पेड आहे. या कंपनीने नुकतेच आपल्या सब्सिडियरी लॉन्गफिन कॉर्पला अमेरिकेत नॅस्डैक एक्सचेंजवर लिस्ट केले होते. गेल्या आठवड्यात 2.5 डॉलर प्रति इश्यू दराने विक्रीनंतर लिस्टिंगच्या वेळी लॉन्गफिनचे मार्केट कॅप 37 कोटी होते. 
- लॉन्गफिनमध्ये स्टॅम्पेडची भागिदारी 37.14 टक्के आहे. आणि स्टॅम्पेडमध्ये भागिदारी असल्याने बच्चन (2.38 टक्के) यांना देखील अमेरिकेत लिस्टेड फर्मचा नफा मिळणार आहे. 


डीलमुळे बच्चन यांना मिळाले शेअर्स
- लाँगफिनने कंपनीचे 25 लाख रेस्ट्रिक्टेड क्लास ए कॉमन शेअर्सच्या बदल्यात मेरीडियन आणि हाँगकाँगच्या गॅलेक्सी मीडिया लि. च्या अधिपत्याखालील सहयोगी एंटिटीजसोबत अॅसेट्स परचेस अॅग्रीमेंट केले होते. या डीलसोबतच आणखी एक बच्चन लिंक समोर आले. 
- लाँगफिनच्या यूएस रेगुलेटर एसईसीमध्ये दिलेल्या फायलिंगनुसार, जिड्डू डॉट कॉमच्या अधिग्रहणासाठी 25 लाख शेअर्स वाटले गेले. त्यामध्ये 1 लाख शेअर्स गॅलेक्सी मीडिया, 1.25 लाख शेअर्स अमिताभ बच्चन आणि 1.25 लाख शेअर्स अभिषेक बच्चनला मिळाले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर, डिटेलमध्ये जाणून घ्या, कसे बुडाले 650 कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत...