आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ROBBERY: जगातील सर्वात मोठा बँक दरोडा, सुरुंग खोदून लुटले 216 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठा हॅटन गार्डन येथील दरोडा नुकताच चर्चेत आला. या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात वादी आणि प्रतिवादींचे चोरलेल्या मुद्देमालाच्या किमतीवर एकमत झाले आहे. यानंतर चोरीला गेलेला माल त्यांच्या खऱ्या मालकांची शहनिशा करून परत केले जात आहे. 2015 मध्ये पडलेल्या या दरोड्यात लुटलेले सोने, चांदी, दागिने आणि रोख रक्कम इत्यादींची किंमत 216 कोटींच्या घरात आहे.

 

34 कोटींचा माल केला परत
> सरकारी वकिलांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वात महत्वाचे म्हणजे, लुटलेला माल मिळवण्यात यश आले असून तो त्यांच्या मालकांना परत केला जाणार आहे. 
> आतापर्यंत लूट झालेल्यापैकी 34 कोटींची रोख आणि मुद्देमालासह एकूण दोन तृतियांश माल पीडितांना परत करण्यात आला आहे. उर्वरीत माल परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
> या प्रकरणातील दरोडेखोरांना 7 वर्षांची कैद सुनावण्यात आली असून ते सध्या तुरुंगातच आहेत. दुसऱ्या एका आरोपीला 6 वर्षांची कैद सुनावून 43 लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले होते.

 

असा पडला होता दरोडा
2015 मध्ये लंडनच्या हॅटन गार्डन सेफ डिपॉझिट कंपनीत ही घटना घडली होती. या कंपनीच्या अंडरग्राउंडमध्ये असलेल्या तिजोरीपर्यंत चोरटे सुरुंग खोदून पोहोचले होते. त्यांनी भिंती सुद्धा कापून अब्जावधींचा माल लुटला होता. सुरुवातीला पोलिसांनी 120 कोटी रुपयांच्या लूटचे वृत्त दिले होते. यानंतर चौकशीत 216 कोटी चोरीला गेल्याचे समोर आले होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...