आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने मागितली जाहीर माफी, Quantico मध्ये केला \'हिंदू दहशतवादाचा\' उल्लेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने वादग्रस्त सीरियल क्वांटिको प्रकरणी आपल्या फॅन्सची जाहीर माफी मागितली आहे. क्वांटिकोच्या एका एपिसोडमध्ये ती ज्या आरोपीला पकडते त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळ दाखवण्यात आली आहे. तो स्फोटाचा कटकारस्थान करत असतो. एपिसोडच्या क्लिपमध्ये ती या आरोपीची ओळख हिंदू दहशतवादी अशी करते. तसेच हा दहशतवादी पाकिस्तानला अडकवण्यासाठी भारतातर्फे कटकारस्थान करत आहे असेही म्हणताना दिसून आली. यानंतर क्वांटिको शोमुळे प्रियांका चोप्रा विरोधात सोशल मीडियावर  #ShameonyouPriyankaChopra हॅशटॅग सुरू करण्यात आला. या सीरियलमध्ये ती एफबीआय एजंटची भूमिका साकारत आहे.


मला भारतीय असल्याचा गर्व -प्रियांका
प्रियांकाने ट्वीट करून आपल्या वादग्रस्त एपिसोड विषयी माफी मागितली आहे. तिने लिहिले, “मी अतिशय दुखी आहे. क्वांटिकोमध्ये असलेल्या माझ्या भूमिकेमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. असे करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. मी यासाठी सर्वांची मनातून माफी मागते. मला भारतीय असल्याचा गर्व आहे आणि नेहमीच राहील. हे कधीच बदलणार नाही.”


प्रियांकाच्या या डायलॉगवर वाद
"हा पाकिस्तानी नाहीत. याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. पाकिस्तानी मुसलमान रुद्राक्ष आपल्या गळ्यात घालणार नाही. हा एक भारतीय व कट्टर राष्ट्रवादी आहे. तसेच पाकिस्तानला फसविण्याचा प्रयत्न करत आहे."


निर्मात्यांनीही मागितली माफी
क्वांटिकोचे निर्माता एबीसी नेटवर्कने हिंदू दहशतवाद दाखवल्याप्रकरणी माफी मागितली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, "या एपिसोडमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. परंतु, यात प्रियांका चोप्राला लक्ष्य करणे चुकीचे आहे. प्रियांकाने हा शो बनवलेला नाही. तिने या शोसाठी लिहिले किंवा दिग्दर्शन सुद्धा केलेले नाही."


#ShameonyouPriyankaChopra ने ट्रोल
सोशल मीडियावर शोची एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोक प्रियांकाला शेम ऑन यू प्रियांका या हॅशटॅगने ट्रोल करत आहेत. तिच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटरवर एकाने तर तिच्या पासपोर्ट बंदीची मागणी केली. तसेच काहींनी तिला देशात प्रवेशच देऊ नका हॉलिवूडमध्येच ठेवा अशी मागणी केली.

 

बातम्या आणखी आहेत...