आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाचा आपल्याच जनतेवर बाॅम्बवर्षाव; 30 गोळे डागले, 57 मुलांसह 200 मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरुट- सिरियात बंडखोरांच्या ताब्यातील पूर्व घोउटाच्या परिसरातील अड्ड्यांवर सैन्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. सैन्याने हवाई हल्ल्याद्वारे दर मिनिटांस २५-३० बाँबगोळे डागले. मंगळवारी या हल्ल्यांत ५७ मुलांसह २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ३२५ लाख जखमी झाले. सैन्याने दहशतवादी दडून बसलेल्या परिसरात असलेल्या चार रुग्णालयांना देखील उदध्वस्त केले. सिरियाचे सैन्य कुर्दांच्या ताब्यातील आफरिनमध्ये घुसल्याचे वृत्त आहे. 


सिरियन निरीक्षक संस्थेने राजधानी दमास्कसच्या बाहेेरील बाँबहल्ल्यांतील नागरिकांच्या मृत्यूची संख्या २०१५ मधील घटनेपेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. सैन्याच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत १५ हजारावर लोकांना शहर, घर सोडून पलायन करावे लागले आहे. दरम्यान, एक रक्ताने माखलेले मूल माझ्याकडे आणण्यात आले होते. त्याचे तोंड रेतीने भरलेले होते. तो वाळूसह श्वासोच्छवास घेत होते, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.  घोउटाची परिस्थिती १९९० च्या दशकासारखी झाली आहे. त्या दरम्यान घोउटामध्ये नरसंहार झाला होता. त्या नरसंहाराचीच सैन्याने मंगळवारी पुनरावृत्ती केली. 


३ महिन्यांत ८०० जणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राने सिरियातील सैन्याला फटकारले होते. घोउटा परिसरातील निर्दोष नागरिक व मुलांचा त्यांच्या हल्ल्यात मृत्यू होत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले होते. आतापर्यंत तीन महिन्यात घोउटामध्ये ८०० जणांचा मृत्यू झाला होता. घोउटाची लोकसंख्या ४ लाख आहे. २०१२ पासून हे शहर बंडखोरांच्या ताब्यात आहे.


- २०११ मध्ये सिरियातील युद्धानंतर सुमारे ८० लाख मुलांना फटका. २४ लाख मुले स्थलांतरित.
- १७.५ लाख मुले शाळाबाहेर. तीनपैकी एक शाळा बंद आहेत.
- चारपैकी १ मुलगा मानसिक आजाराने ग्रस्त. 

बातम्या आणखी आहेत...