आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी मृत्यू प्रकरणी बोनी कपूर यांना क्लीनचिट; दुबई पोलिसांनी परत केला पासपोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी कपूरच्या मृत्यूवर नवा खुलासा झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता श्रीदेवीच्या डोक्यावर जखमा सापडल्या आहेत. दुबई पोलिसांनी मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर सरकारी वकिलांनी नाहरकत प्रमाणपत्र जारी केला. तसेच एमबाल्मिंग प्रक्रियेसाठी पार्थिव रवाना देखील केला. पण, पोलिस आणि तपास अधिकारी बोनी कपूर यांच्या चौकशीबद्दल संतुष्ट नाहीत. त्याच दरम्यान, बोनी कपूर यांचा पासपोर्ट रद्द झाल्याचे वृत्त समोर आले. मात्र, दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांना क्लीनचिट दिली. तसेच श्रीदेवीच्या पार्थिवासह बोनी कपूरही भारतात परतण्यासाठी मोकळे झाले. 

 

तत्पूर्वी मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांची दुबई पोलिसांनी तिसऱ्यांदा चौकशी केली. तसेच ते त्यांच्या जबाबावर अद्यापही संतुष्ट नव्हते. त्यांना श्रीदेवीच्या मृतदेहासह भारतात पाठवले जाणार किंवा नाही हे सुद्धा स्पष्ट नव्हते. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बोनी कपूर यांच्यासह पोलिसांनी त्यांच्या बहिणीचे पासपोर्ट सुद्धा जप्त केले. पण, हे दोन्ही पासपोर्ट फक्त चौकशीपुरते जप्त करण्यात आले होते, हे आता स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...