आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - नेदरलंडचे हे गाव जगातील आश्यचर्यापेक्षा कमी नाही. बार्ले-नस्सो नावाच्या या गावाचा अर्धा भाग नेदरलंडमध्ये तर दुसरा भाग बेल्जियममध्ये आहे. बेल्जियममध्ये हे गाव बार्ले-हटरेग नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे, गावातील काही घरे आणि दुकानांसह हॉटेलचे रुम सुद्धा दोन देशांमध्ये विभागले आहेत. बॉर्डरची ओळख ठेवण्यासाठी त्या-त्या ठिकाणी पांढरी रेषा मारण्यात आली आहे.
- 1831 मध्ये बेल्जियम आणि नेदरलंड या दोन स्वतंत्र देशांची स्थापना झाली. त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये सीमारेषा लावण्यात आली. नेजरलंडसाठी ही बॉर्डर पोस्ट 214 तर बेल्जियमसाठी 215 आहे.
- पण, विभाजनाच्या वेळी बार्ले नस्सो आणि बेल्जियमच्या बार्ले-हटरेग असे एक गाव होते ज्याचे विभाजन करणे अशक्य बनले.
- त्यामुळेच, एक जनमत चाचणी घेऊन दोन्ही देशांच्या सरकारांनी गावाच्या मध्यभागातून एक पांढरी पट्टी पेंट करून सीमा रेषा लावली.
- त्यामुळे गावाचा एक भाग बेल्जियम तर दुसरा भाग नेदरलंडमध्ये आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, गावकरी आणि दोन्ही देशांचे संबंध चांगले असल्याने एकमेकांच्या देशात जाण्यासाठी फक्त एक पाय टाकावा लागतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या व्हीसाची गरज नाही.
- तेव्हापासूनच हे गाव पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. ज्या हॉटेलच्या खोल्या दोन देशांमध्ये विभागले आहेत त्याच खोलीत थांबण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. सोशल मीडियावर अशा घर आणि हॉटेलांचे फोटो पोस्ट केले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.