आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉसला सुटी मागण्यासाठी घाबरतात 30% भारतीय;42 टक्के कर्मचारी घेत नाहीत सुटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- कार्यालयातून सुटी घेण्यात भारतीय लोक खूप मागे आहेत. देशातील ६५ टक्के कर्मचारी कार्यालयाकडून मिळणाऱ्या सुट्याही घेऊ शकत नाहीत. वर्षाच्या शेवटी त्यांच्या बऱ्याच सुट्या शिल्लक राहतात. कामाचा भार अधिक असल्याने कार्यालयातील ४२ टक्के कर्मचारी सुट्या घेत नाहीत, तर ३० टक्के कर्मचारी साहेबांच्या भीतीपोटी सुटीबद्दल त्यांना विचारण्यास कचरतात. भारतीय लोकांच्या सुटी घेण्याच्या सवयीबद्दल ब्रिटिश एअरवेजने एक संशोधन केले आहे. यातून ही बाब स्पष्ट झाली.   


२० डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ या कालावधीदरम्यान २ हजार भारतीय कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांचे अनुभव या संशोधनात नोंदवले गेले. भारतीय कर्मचाऱ्यांना वर्षाला सरासरी १७ पगारी सुट्या मिळतात, परंतु कामाचा भार अति असल्याने अनेक जण सुट्या घेऊ शकत नाहीत. १६ टक्के लोकांना डिसेंबर महिन्यामध्येच उर्वरित सुट्यांबद्दल आठवण होत असते. ६० टक्के कर्मचारी सुटीवर गेले तरी कार्यालयातील त्यांचा तणाव कायम असल्याचे संशोधनातून समोर आले. सुट्या घेतल्या गेल्या नाहीत म्हणून अनेकांच्या मनात खंतही राहते. ५९ टक्के कर्मचाऱ्यांना आपण अधिक सुट्या घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे वाटते.   अर्ध्या दिवसाची सुटी किंवा काम करत असताना छोटासा ब्रेक मिळाला तरी पुरेसे आहे, असे ३२ टक्के लोकांनी म्हटले आहे. दुसरीकडे सुटी संपवून कामावर जाण्यासाठी केवळ ११ टक्के लोक आतुर असतात. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा,या कारणामुळे मिळत नाही सुटी... 

बातम्या आणखी आहेत...