आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात झाला गँगरेप, तेथेच थांबून बदला घेणाऱ्या धाडसी महिलेची सत्यकथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅसेलिसा... - Divya Marathi
व्हॅसेलिसा...

इंटरनॅशनल डेस्क - परदेशात फिरण्यासाठी गेलेल्या ब्रिटिश महिलेच्या धाडसाचे जगभरात कौतुक केले जात आहे. ती मोटरसायकलने बोलिव्हियाला गेली आणि तेथे तंबू ठोकून राहत होती. याच ठिकाणी 3 नराधम तिच्या टेन्टमध्ये घुसले. त्यांनी तिला ओढून फरपटत बाहेर फेकले आणि तिच्याकडून पैसे आणि मोल्यवान वस्तू लुटल्या. मग, तिघांनी चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला बेदम मारहाण करून मरण्यासाठी सोडून दिले. पण, ती केवळ वाचलीच नाही, तर त्याच देशात थांबून तिने त्या सर्वांचा बदला घेतला. 


असे आहे प्रकरण...
- 37 वर्षीय बाइकर व्हॅसेलिसा कोमारोवा बाइकने जगभ्रमंतीवर निघाली होती. तिने 14 महिन्यांपूर्वी चिली येथून आपला प्रवास सुरू केला. गतवर्षी जून महिन्यात ती एकटीच बोलिव्हियात पोहोचली होती.
- होन्डा टोरनॅडो 250 बाइकवर तिने 6000 मैलांचा प्रवास केला होता. या दरम्यान ती विविध ठिकाणी टेन्ट लावून थांबत होती. बोलिव्हियात पोहोचली तेव्हा सुद्धा तिने विश्रांतीच्या हेतूने एक टेन्ट लावला. त्याचवेळी तीन सशस्त्र युवक तिच्या तंबूत घुसले. 
- त्या तिघांनी व्हॅसेलिसावर अचानक हल्ला केला तसेच तिचे पाय ओढून फरपटत तंबूबाहेर काढले. चाकूचा धाक दाखवून तिच्याकडून पैसा आणि मोल्यवान वस्तू लुटल्या. ती एकटीच असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी आळी-पाळीने तिच्यावर बलात्कार केला. इतकी मारहाण केली की ती काही मिनिटांतच तिचा जीव जाईल असे वाटत होते. यानंतर तिला मरण्यासाठी सोडून ते तिघे पसार झाले. 
- पण, व्हॅसेलिसा जगली. उपचार सुरू असताना प्रत्येकाने तिला आपल्या देशात परतण्याचे सल्ले दिले, आग्रह केला. परंतु, ती कुठेही गेली नाही. त्याच देशात राहून तिने अन्यायाविरोधात संघर्ष केला आणि त्या सर्व नराधमांना शोधून 42 वर्षांची कैद मिळवून दिली. 

 

सरकार विरोधातही लढली व्हॅसेलिसा
- मूळची रशियन असलेली व्हॅसेलिसा 20 वर्षांची असताना मॉस्को ते लंडन आली होती. तिला ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले. 
- बोलिव्हियात राहताना तिला मोठा संघर्ष करावा लागला. एवढेच नव्हे, तर प्रतिष्ठा पणाला लागल्याने बोलिव्हिया सरकार सुद्धा व्हॅसेलिसाच्या विरोधात गेली होती. त्यावेळी ब्रिटिश दूतावासाने तिची मदत केली. 
-व्हॅसेलिसाने संडे मिररला सांगितल्याप्रमाणे, ''या लोकांमुळे बलात्काराच्या असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. मला माहिती आहे, की त्या वेदना कशा असतात. आपण एकटे बाहेर पडण्याचा विचारही करू शकणार नाही.''
- ती पुढे म्हणाली, ''मला या घटनेनंतर अनेकांनी बोलिव्हिया सोडून आपल्या देशात परतण्याचे सल्ले दिले होते. कुणालाच वाटत नव्हते, की मला न्याय मिळू शकले. मी संघर्ष सुरूच ठेवला. कारण, मला माहिती होते, की मी लढले नाही तर इतर महिलांसोबतही असेच होत राहील.''


पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...