आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवसा घराबाहेर पडायला घाबरतात येथील लोक, कारण हैराण करणारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाओलो - ब्राझीलमध्ये एक गाव असेही आहे, ज्या ठिकाणी लोक दिवसा घराबाहेर पडायला घाबरतात. त्यांना कुठल्याही माणसाची किंवा जनावराची नाही, तर साऱ्या जिवांना ऊर्जा देणाऱ्या सूर्याची भिती वाटते. उन्हामुळे त्यांना कशा प्रकारचे नुकसान होतात याचा अंदाजही लावणे कठिण आहे. ब्राजीलच्या साओ पाओलो जिल्ह्यातील अरारस नावाच्या गावात स्थानिकांना 'एक्सपी' नावाचे अनुवांशिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्यांना उन्हात आणणे एक कठोर शिक्षा आहे. सूर्य किरणांमुळे त्यांच्या स्किनसह साऱ्या शरीराची आग होते. 


- जगात एक्सोडरमा पिगमेंटोझ्म अर्थातच एक्सपी या आजाराने ग्रस्त असलेल्यांची सर्वाधिक संख्या याच गावात आहे. सूर्य प्रकाश या लोकांसाठी शिक्षा आहे. 
- एक्सपी हा आजार अधिक गंभीर झाल्यास त्याचे रुपांतर स्किन कॅन्सरमध्ये होते. अशात त्वचेला होणारे नुकसान कमी करणे अशक्य ठरते. 
- उन्हात निघताच या रुग्णांची त्वचा भडक लाल होते. उन्हाचे भयंकर चटके बसतात. तसेच शरीराच्या नाजूक भागांवरील त्वचेला सर्वाधिक नुकसान पोहोचतो. 
- अरारस या गावातील स्थानिक बहुतांश शेतीवर विसंबून आहेत. त्यामुळे, पोट भरण्यासाठी त्यांना उन्हात जावेच लागते. त्यामुळे, येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन दिवसेंदिवस आणखी विकट होत आहे. 
- हा आजार अतिशय दुर्मिळ असून तो 10 लाखांत एकाला होतो. मात्र, या गावातच 600 हून अधिक एक्सपी रोगी आहेत. त्यापैकी 20 जणांचा अवस्था अतिशय वाइट आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...