आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या शाही घराण्यात जन्मला नवा राजकुमार, येताच घेतली काका प्रिन्स हॅरींची जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या प्रिन्सला जन्म दिला तेव्हा रुग्णालयाबाहेरचा फोटो... - Divya Marathi
पहिल्या प्रिन्सला जन्म दिला तेव्हा रुग्णालयाबाहेरचा फोटो...

लंडन - ब्रिटिश राजघराण्याच्या डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटने आपल्या तिसऱ्या अपत्याला जन्म दिला आहे. केन्सिंगटन पॅलेसने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, तो एक राजकुमार आहे. केट मिडलटनला पहाटे 6 च्या सुमारास लेबर पेन झाल्यानंतर लंडनच्या पॅडिंगटन येथील सेंट मॅरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रिटनच्या स्थानिक वेळेनुसार, सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास राजकुमाराचा जन्म झाला. नवीन राजकुमार जन्माला येताच शाही तख्ताचा आणि महाराणी एलिझाबेथ यांचा 5 वा वारसदार ठरला आहे. या रुग्णालयाच्या बाहेर नवीन प्रिन्सची एक झलक टिपण्यासाठी केवळ माध्यमच नव्हे, तर नागरिक सुद्धा एकवटले आहेत.


जन्म घेताच घेतली काका प्रिन्स हॅरीची जागा
ब्रिटिश राज घराण्यात नवीन प्रिन्सने जन्म घेताच आपले काका प्रिन्स हॅरी यांची जागा घेतली आहे. महाराणी एलिझाबेथ यांचा तो थेट 5 वा वारसदार बनला आहे. अर्थातच यापूर्वी 5 व्या क्रमांकावर असलेले काका प्रिन्स हॅरी यांची जागा त्याने घेतली आहे. 

 

शाही मुकुटसाठी अशी आहे क्रमवारी
ब्रिटिश राजघराण्याचा ताज मिळवण्यासाठीच्या शर्यतीत सर्वात पुढे अर्थात पहिल्या क्रमांकावर प्रिन्स ऑफ वेल्स प्रिन्स चार्ल्स आहेत. महाराणी एलिझाबेथनंतर थेट ते महाराजा होऊ शकतात. यानंतर द ड्यूक ऑफ केम्ब्रिज म्हणजेच विल्यम यांचा क्रमांक लागतो. विल्यम आणि केट यांचे पहिले अपत्य प्रिन्स जॉर्ज ऑफ केम्ब्रिज तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रिन्स चार्ल्सची बहिण प्रिन्सेस शार्लोट चौथ्या क्रमांकावर आहे. आता सोमवारी जन्मलेल्या प्रिन्सने 5 व्या वारसदाराचा मान मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...