आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वीच गुपचूप भेटले भावी पती-पत्नी, सर्वांसमोर मिळाली ही शिक्षा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - इंडोनेशियात एका कपलला लग्नाच्या काही दिवसांपूर्वी डेट करणे महागात पडले आहे. येथील एका महिलेला आणि तिच्या पतीला सर्वांसमोर चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. लग्नापूर्वीच ते एकमेकांच्या जास्त जवळ आले होते, असा आरोप त्यांच्यावर लागला आहे. इंडोनेशियातील आचे प्रांतात कठोर शरिआ कायदे लागू आहेत. यात लग्नापूर्वी तरुण-तरुणीने एकमेकांची भेट घेणे म्हणजे, लग्नापूर्वीच शारीरिक संबंध बनवणे मानले जाते. यात महिला आणि पुरुष अशा दोघांनाही सर्वांसमोर रस्त्यावर आणून चाबकाचे प्रत्येकी 20-20 फटके मारले जातात.

 

- ज्या दिवशी या जोडप्याला शिक्षा देण्यात आली त्याचवेळी आणखी काही लोकांनाही चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. त्यापैकीच एक दारु विक्रेत्याला 36 फटके मारले गेले. यासोबत एकूण 8 पुरुष आणि 2 महिलांना शिक्षा दिली. 
- शिक्षा देत असताना त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी बोलावले जातात. ती व्यक्ती चाबकाचे फटके सहन करू शकते का, किंवा वेदनेने बेशुद्ध पडल्यास त्यांची काळजी घेणे या डॉक्टरांचे काम आहे. 
- विशेष म्हणजे, इंडोनेशियातील आचे प्रांतात अधिकृत सरकार नाही. फुटिरतावद्यांना कंटाळून इंडोनेशिया सरकारने त्यांना काही विशेषाधिकार दिले आहेत. त्यामध्ये शरिआ कायद्याचे पालन करण्याची परवानगी देण्याचा सुद्धा समावेश आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शिक्षा देत असताना टिपलेले आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...