आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'झिंगाट\' होऊन लग्नासाठी निघाली वधू, पोलिसांनी अशाच अवस्थेत केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनिक्स - अमेरिकेतील अॅरिझोना प्रांतात पोलिसांनी एका वधूला भर-रस्त्यावर वेडिंग गाऊनमध्येच अटक केली. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने स्वतःच्या लग्नासाठी जात होती. त्याचवेळी तिच्या कारने दुसऱ्या एका वाहनाला धडक दिली. त्या वाहनाने आणखी एका वाहनाला धक्का दिला. अशात हायवेवर वाहनांचा तिहेरी अपघात झाला. त्यामुळे, तिला अटक करण्यात आली. 

  

पोलिस काय म्हणाले?  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना धडकल्यानंतर पोलिस संशयिताच्या कारजवळ गेले. त्या कारमधून चक्क वेडिंग गाऊनमध्ये एक महिला बाहेर आली. ती दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय पोलिसांना आला. पण, तिने स्पॉटवर ब्लोअर टेस्ट देण्यास नकार दिला. त्यामुळे, तिला पुढील तपासासाठी पोलिस स्टेशनला न्यावे लागले. त्या ठिकाणी संबंधित वधूने दारु पिल्याचे निष्पन्न झाले. मात्र, ती आपल्या लग्नासाठी जात असल्याचे पाहता पोलिसांनी नरमाई केली आणि तिला सोडून दिले. 

बातम्या आणखी आहेत...