आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Call Girl मुळे गेली पंतप्रधानांची खुर्ची, मंत्र्यासोबत होते अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनमध्ये 60 च्या दशकात सेक्स स्कॅन्डल गाजवणारी क्रिस्टीन कीलर हिचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. 1961 मध्ये क्रिस्टीन 19 वर्षांची असताना तिचे तत्कालीन ब्रिटिश मंत्री जॉन प्रोफ्यूमा यांच्यासोबत अफेअर होते. जगासमोर हे गुपित येताच तत्कालीन पंतप्रधान हेरॉल्ड मॅकमिलन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

 

> 1961 मध्ये 19 वर्षांची असताना कीलर लंडनच्या एका बारमध्ये कॅब्रे डान्सर होती. त्याचवेळी तिची भेट मंत्री जॉन प्रोफ्युमा यांच्याशी झाली. 
> जॉन त्यावेळी युद्ध मंत्री होते. यासोबतच ते पंतप्रधान कार्यालयात सरकारचे रायटिंग स्टार होते. कीलर प्रोफ्युमा यांच्याशी संबंध ठेवत असताना ती रशियाचे (त्यावेळचे सोव्हिएत) लष्करी नेते येव्हगेनी इव्हानोव्ह यांच्याही संपर्कात होती. 
> कीलरशी संबंधित एका घटनेचा पोलिस तपास करत होते, त्याचवेळी तिचे जॉन यांच्याशी अफेअर उघडकीस आले. 
> सुरुवातीला प्रोफ्युमा आणि सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अफेअर ठेवणे काही गुन्हा नाही, असे 1963 मध्ये त्यांनी संसदेत म्हटले होते. 
> त्याचवेळी सोव्हिएत मिलिट्री लीडरसोबतही तिचे संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर जॉन यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालणे आणि हेरगिरी असे गंभीर आरोप लागले. 
> अखेर वाढत्या दबावामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. विरोधक तरीही शांत बसले नाही. त्यांनी पंतप्रधान मॅकमिलन यांचाही राजीनामा घेतला. एवढेच नव्हे, तर कीलरला यानंतर 6 महिन्यांची कैद देखील झाली. 
> त्यावेळी माध्यमांनी कीलरचे न्यूड फोटोज जारी केले होते. तेव्हा जगभरात या बातम्यांची आणि स्कॅन्डलची चर्चा झाली होती. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, कीलरच्या तारुण्यातील आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...