आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघनचे सासरे निभावणार वडिलांची भूमिका! शाही लग्नातील खर्चाचे रेकॉर्ड देखील मोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगभरातील बहुचर्चित शाही विवाह सोहळ्याची अखेर 19 मे रोजी संपली आहे. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या घोषणेनंतर अखेर प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेघन मार्कल यांचा विवाह सोहळा पार पडत आहे. या विवाह सोहळ्यात जगभरातील राजकारण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रांमधून फक्त 600 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि मुंबईच्या डबेवाल्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात 787 कोटी रुपये खर्च होत आहेत. प्रिन्स हॅरी यांचे मोठे बंधू प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या विवाह सोहळ्याशी तुलना केल्यास हा खर्च 13 पट अधिक आहे. हॅरी आणि मेघन यांचा विवाह प्रेक्षकांच्या आकडेवारीत मागील सर्व विक्रम मोडणार असेही सांगितले जात आहे. 


केट-विल्यमच्या लग्नाच्या तुलनेत 13 पट अधिक खर्च
- हॅरी-मेघन यांच्या शाही विवाह सोहळ्यात 8.4 कोटी ब्रिटिश पाउंड अर्थात 787 कोटी रुपये खर्च होत आहेत. शाही विवाह सोहळ्याची प्लॅनिंग करणाऱ्या कंपनीच्या (ब्राइडबुक) माहितीप्रमाणे, लग्न समारंभावर 3.2 कोटी पाउंड, संरक्षणावर 3 कोटी पाउंड आणि इतर कामांसाठी अंदाजित 2.4 कोटी पाउंड इतका खर्च होणार आहे. 
- 2011 मध्ये प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या लग्नात फक्त 63.5 लाख ब्रिटिश पाउंड (58 कोटी रुपये) खर्च झाले होते. अर्थातच विल्यम आणि केट यांच्या लग्नात झालेल्या खर्चाच्या तुलनेत हॅरीच्या लग्नावर 13 पट अधिक खर्च केला जात आहे. 


सासरे निभावणार वडिलांची भूमिका!
- शाही लग्नात पादरी पर्यंत पोहोचण्यासाठी दोन विधी असतात. पहिल्या टप्प्यात मेघन पेज बॉइज आणि ब्राइडमेडसोबत पोझ करणार आहे. त्यामध्ये शाही घराण्यातील लहान मुलांचा समावेश असेल. 
- ख्रिस्ती धर्मात होणाऱ्या लग्नात वडील आपल्या मुलीला स्टेजपर्यंत (पादरीपर्यंत) हात पकडून घेऊन जातात. त्यास गिव्हिंग अवे सेरेमनी असे म्हटले जाते. मेघनचे वडील थॉमस यांची तब्येत कथितरीत्या योग्य नसल्याने ते या लग्नात उपस्थित राहणार नाहीत. 
- अशात मेघनला स्टेजपर्यंत नेण्याची जबाबदारी प्रिन्स चार्ल्स पार पाडतील असे जाहीर करण्यात आले आहे. तेच मेघनचा हात धरून तिला स्टेजपर्यंत नेतील. 
- मोमेंटच्या शेवटी जेव्हा आर्कबिशप विचारतील की वधूचे हात वराच्या हातात कोण देतील. तेव्हा हॅरीचे वडीलच ती भूमिका पार पाडणार आहेत. 
- ब्रिटिश मीडियाच्या वृत्तानुसार, प्रिन्स चार्ल्स (होणारे सासरे) यांना ही विनंती मेघन मार्कलने स्वतः केली होती. त्यामुळेच चार्ल्स यांनी ती विनंती स्वीकारली आहे. 


13 वर्षांपूर्वी याच ठिकाणी वडिलांचा दुसरा विवाह
शाही लग्नाचे सर्व विधींसाठी 101 वर्षांपूर्वी बांधलेल्या विन्डसर कासल चर्चची निवड करण्यात आली. 2005 मध्ये प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनी याच चर्चमध्ये कॅमिला पार्कर यांच्याशी दुसरा विवाह केला होता. 13 वर्षांनंतर त्याच ठिकाणी मुलाचा विवाह होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...