आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात; चीनच्या एकाधिकारशाहीला आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- दक्षिण चीन समुद्रात संचाराचे स्वातंत्र्य प्रत्येक देशाला आहे, हे दाखवून देण्यासाठी ब्रिटनची युद्धनौका येथून प्रवास करणार आहे. हे सागरी क्षेत्र आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र आहे असा दावा आंतरराष्ट्रीय समुदायाचा आहे. ब्रिटनची युद्धनौका ऑस्ट्रेलियाहून रवाना होईल. ब्रिटनचे संरक्षण सचिव गॅव्हिन विल्यम्सन यांनी म्हटले आहे की, पाणबुडीरोधक युद्धनौका एचएमएस सदरलँड या आठवड्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला पोहोचेल. ब्रिटनला परतताना ही नौका द. चीन समुद्र मार्गाने जाणार आहे.  


ब्रिटनच्या नौदलाला येथील आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात संचाराचे स्वातंत्र्य आहे, हे याद्वारे दाखवले जाईल. विल्यम्सन यांनी युद्धनौकेचा निश्चित मार्ग सांगितलेला नाही. वादग्रस्त सागरी क्षेत्रापासून १२ मैलांच्या अंतरावरून यापूर्वी अमेरिकी युद्धनौका गेली होती. चीनने निर्माण केलेल्या कृत्रिम बेटाजवळून अमेरिकेची नौका गेली होती. द.चीन समुद्राविषयी अमेरिकेच्या धोरणाचे ब्रिटन पूर्ण समर्थन करतो , असे संरक्षण सचिवांनी सांगितले. विल्यम्सन म्हणाले की, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासाठी ही चांगली संधी आहे. दक्षिण चीन समुद्रावर चीन एकाधिकारशाही सांगत आहे. त्याला मोडीत काढण्याचा पाश्चात्त्य देशांचा उद्देश आहे.  


चीनच्या शेजारी देशांनी याविषयी संयुक्त राष्ट्रांत वारंवार पाठपुरावा केला आहे. अमेरिका-ब्रिटन आता यासाठी एकजुट झाले आहेत. 

 

कोणत्याही देशाने समस्या निर्माण करू नयेत : चीन  
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले की, द. चीन सागर क्षेत्रामध्ये सर्व देशांच्या नौका, विमानांना दळणवळणाचा अधिकार आहे. कोणत्याही देशाने यावरून वाद सुरू करू नयेत. चीन संसाधन संपन्न द. चीन समुद्रावर आपला अधिकार सांगत आला आहे. या क्षेत्रातील बेट व टापूंवर चीन अतिक्रमण करत आहे. ब्रिटनच्या युद्धनौकेमुळे चीन नाराज होण्याची शक्यता आहे.

 

अमेरिका मानवाधिकार उल्लंघनात अग्रणी : उ. कोरिया
संयुक्त राष्ट्र-
द. कोरियामध्ये हिवाळी ऑलिम्पिकनिमित्त उ. कोरियाने आपले प्रतिनिधी मंडळ येथे पाठवले. दोन्ही कोरियात यानिमित्ताने संवाद सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात वारंवार उ. कोरियामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा केला असल्याचा आरोप आता उ. कोरियाच्या संयुक्त राष्ट्र मिशनने केला आहे. उ. कोरियापेक्षा अमेरिका जगभरात मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...