आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रित वृत्तपत्र वाचण्यास ब्रिटिश तरुणांची पसंती; लंडन विद्यापीठाच्या संशोधकांचा अभ्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- वृत्तपत्रांच्या खपातील घट व स्मार्टफाेनवरील बातम्यांची उपलब्धता असूनही आजचा तरुण वर्ग वेब किंवा अॅपच्या तुलनेत मुद्रित वर्तमानपत्र वाचण्यासाठी जास्त वेळ देत आहे. ब्रिटनमध्ये २०१६ मध्ये १८ ते ३६ वर्षे या वयोगटातील तरुणांच्या पाहणीनंतर हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.


ब्रिटनमधील तरुणांनी आठ राष्ट्रीय वृत्तपत्रांसाठी वाचनावर सरासरी २१.१ अब्ज मिनिटे खर्च केली. तुलनेने संकेतस्थळ व अॅपवरील वृत्तपत्र वाचनासाठी केवळ ११.९ अब्ज मिनिटे दिली होती. लंडन विद्यापीठाच्या संशोधकांनी मुद्रित तसेच ऑनलाइनवरील वृत्तपत्र वाचनासाठी देण्यात आलेल्या वेळेचा सखोल अभ्यास केला. त्यात व्यापक पाहणी बरोबरच ऑनलाइन युजर मेजरमेंट या तंत्राचा देखील वापर करण्यात आला होता. त्यावरून वृत्तपत्रांच्या खपाचा आकडा कमी झाला व स्मार्टफोनवरील बातम्यांचे महत्त्व वाढले असले तरी सर्व वयोगटातील लोक संकेतस्थळ किंवा अॅपच्या तुलनेत मुद्रित अर्थात वृत्तपत्र वाचण्यात जास्त वेळ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लंडन विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रोफेसर नील थुरमॅन म्हणाले, वृत्तपत्र वाचण्यासाठी दिलेला वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान तरुण तसेच मध्यम वयातील वाचकांना वाटते. पाहणीतून नेमके ही गोष्ट दिसून आली. ऑनलाइन आणि अॅपच्या बातम्या वाचून मात्र असा अनुभव येत नसल्याचे वाचकांना वाटते.

अभ्यासातील नवी तथ्ये

१८ ते ३४ वर्षे वयाचे तरुण २३ मिनिटे वृत्तपत्र वाचनासाठी देतात तर ऑनलाइन बातम्या वाचण्यासाठी सरासरी केवळ ४३ सेकंद देतात. (शनिवार आणि रविवारी इतर दिवसांच्या तुलनेत जास्त वेळ वृत्तपत्र वाचनासाठी देतात.)

 

 

डिजिटल माध्यमांना दिली टक्कर 
ऑनलाइन वाहिन्यांच्या तुलनेत वृत्तपत्र तरुण वाचकांना आपल्याकडे जास्त आकर्षित करतात. मुद्रित माध्यमांपेक्षा डिजिटल माध्यमांची पोहोच अधिक आणि ते स्वस्त असूनही वृत्तपत्रांचा प्रभाव कमी झालेला नाही.

 

बातम्या आणखी आहेत...