आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 अंश सेल्सियसवर घामाघूम झाले ब्रिटन, बीचवर जाण्यासाठी नागरिकांच्या रांगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारतातील अनेक शहरांत तापमानाने 45 अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. कडक उन्हाळा आणि गर्मीने लोकांचे हाल झाले आहेत. पण, ब्रिटनमध्ये 27-28 अंश सेल्सियस तापमानावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अशी झाली की अनेक नागरिकांनी आपले घर सोडून समुद्रकिनारी वेळ घालवणे पसंत केले. त्यामुळे, बीचवर गर्दी झाली आणि प्रवेशासाठी लोकांना चक्क रांगा लावाव्या लागल्या. सोबतच विविध बीचकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झाला आहे. 


> ब्रिटनमध्ये सध्या समर व्हॅकेशन्स सुरू आहेत. त्यातच तापमानामुळे लोकांचे हाल झाल्याने सगळेच बीचच्या दिशेने निघाले आहेत. ताशी शेकडोंच्या संख्येने गाड्या विविध समुद्र किनाऱ्यांवर येत आहेत. पाहता-पाहता सोमवारी तर गर्दी इतकी वाढली की लोकांना बसण्यासाठी जागा मिळणे कठिण झाले होते. 
> सोमवारी ब्रिटनमध्ये बँक हॉलिडे असतो. तापमान 28 डिग्री सेल्सियसवर पोहोचल्याने लोकांचे हाल झाले. भारतासाठी हे तापमान कमी वाटत असले तरीही ब्रिटनमध्ये तापमानाने हा उच्चांक 1978 नंतर पहिल्यांदाच गाठला आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...