आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीबियाचा कुख्यात हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा अंतही झाला होता तेवढाच क्रूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर तानाशहांपैकी एक मुअम्मर गद्दाफीचा जन्म 7 जून रोजी झाला होता. या तनाशहाने लीबियावर 40 वर्षे राज्य केले. त्याच्या अत्याचाराच्या कथा जगभरात कुप्रसिद्ध आहेत. पण, हा हुकूमशहा जेवढा क्रूर होता, त्याचा मृत्यू देखील तेवढ्याच क्रूर पद्धतीने झाला. महालांमध्ये राहणाऱ्या गद्दाफीला ऑक्टोबर 2011 मध्ये बंडखोरांनी रस्त्यावर ओढून आणले. रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तसेच डोक्यात गोळी झाडून ठार मारण्यात आले. गद्दाफीच्या मृत्यूसंदर्भातील एक व्हिडीओ त्याच्या मृत्यूच्या काही वर्षानंतर समोर आला होता. या व्हिडीओमध्ये गद्दाफीचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. त्याच्या कपड्यांमधूनही रक्त गळत होते. तर गद्दाफीविरोधी बंडखोर मात्र आनंदाने नाचताना यात दिसून येत आहे.


मरण्यापूर्वी दयेची भीक मागत होता गद्दाफी...
> सव्वा मिनिटांच्या या मोबाइल व्हिडीओमध्ये गद्दाफी शेवटच्या घटका मोजत असल्याचे जाणवते. अनेक बंडखोर गद्दाफीचे केस पकडून त्याला ओढत नेताना दिसत आहेत. 
> त्यानंतर ते गद्दाफीला उचलून एका ट्रकच्या बोनटवर फेकतात. एक मुलगा त्यावर चढतो, तर दुसऱ्या मुलाने बंदूक रोखलेली आहे. यावेळी गद्दाफीचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. 
> 20 ऑक्टोबर 2011 रोजी बंडखोरांनी गद्दाफीची सिरते शहरात हत्या केली होती. याच शहरात गद्दाफीचा जन्म झाला होता.


कुणी बनवला होता व्हिडीओ...
> अयमान अलमानी नावाच्या बंडखोराने हा व्हिडीओ तयार केला होता. त्यावेळी बंडखोर हवेत बंदूक वर करून, गोळ्या झाडून जल्लोष करत होते. त्यापूर्वी अशा प्रकारचे फुटेज कधीही पाहायला मिळाले नाही.
> या व्हिडिओमध्ये गद्दाफीला ठार मारणारी व्यक्ती एक फ्रेन्च गुप्तहेर असल्याचे आरोप सुद्धा झाले होते. पण, हे आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...