आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत राखेचा महापूर; पावसामुळे ढिगाऱ्यात वाहून गेली घरे, 13 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेंटेसिटाे- अमेरिकेच्या कॅलिफाेर्निया राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाच्या पाण्यासह वाहून अालेल्या मातीच्या व राखेच्या ढिगाऱ्यांनी शहर उद्ध्वस्त करून टाकले अाहे. या ढिगाऱ्यांत डझनभर घरे वाहून गेली. अनेक भागांत अडीच फूट उंचीपर्यंत माती, राखेचा चिखल पसरलेला अाहे. . या नैसर्गिक प्रकाेपामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, घरांच्या छतांवर अडकलेल्या ५०हून अधिक जणांना हेलिकाॅप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात अाले. या घटनेमुळे सुमारे ३० हजारहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.जंगलातील अागीच्या राखेचे ढिगारे: मागील महिन्यात कॅलिफाेर्नियातील जंगलांत भीषण अाग लागली हाेती. त्यामुळे जंगलांत राखेचे ढिगारे तयार झाले हाेते. मुसळधार पावसामुळे हीच राख चिखल बनून शहरात वाहून अाली. 

 

वाॅशिंग्टन; कॅरेबियन द्वीपांवर ७.८ रिश्टरचा भूकंप; सुनामीचा इशारा
कॅरेबियन द्वीपांना बुधवारी ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याचे केंद्र ७ किमी खाेलपर्यंत हाेते.  या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नव्हते. दरम्यान, प्युर्टाेरिकाे शहरास सुनामीचा इशारा देण्यात अाला अाहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी, २०१७ मध्ये नैसर्गिक अापत्तींमुळे अमेरिकेस २० लाख काेटींचे नुकसान...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...