आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - कॅलिफोर्नियात राहणाऱ्या शेरॉन बर्टोजीने फेसबूकवर लिहिलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. गतवर्षी तिला आपल्या घराबाहेर एक अतिशय अशक्त आणि आजारी जनावर दिसून आले. हे एक श्वान असल्याचे तिला वाटले.
4 तासांत समोर आले सत्य...
- पोर्चमध्ये अशक्त पडून असलेल्या जनावरावर महिलेला दया आली. तिने मदत करण्याच्या हेतूने त्याला घरात घेतले. त्या जनावराला जवळ घेऊन त्याला स्वच्छ करत असताना अवघ्या 4 तासांतच तिला हे श्वान नसल्याचे उमगले.
- प्रत्यक्षात, ते जनावर एक कुत्र नसून कोयोट होते. अमेरिकेत कोयोट लांडग्याची एक जात आहे. आपल्या घरात लांडगा बोलावल्याचे लक्षात आल्यानंतर तिने वेळीच City of Folsom Animal Services च्या अधिकाऱ्यांना फोन लावला. अधिकारी घरी आले आणि त्या जनावराला सोबत घेऊन गेले.
- लांडग्याला जेव्हा रेस्क्यू होम घेऊन जात होते, तेव्हा त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता होती. तसेच सर्वत्र खाज सुटली होती. रेस्क्यू टीमने त्याला स्वच्छ करून औषधोपचार केले. ती एक मादा लांडगा होती. रेस्क्यू टीमने तिले प्रिन्सेस असे नाव दिले.
- काही दिवसांत प्रिन्सेसच्या अवस्थेत सुधारणा झाली. तिच्या शरीरावर पुन्हा केस उगवले. पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला जंगलात सोडण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, यासंदर्भातील आणखी फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.