आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: उपाशी कुत्र्याने मालकालाच खाल्ले! पोलिस आले तेव्हा दिसले इतके भयंकर दृश्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पट्टाया - थायलंडमध्ये एका श्वानाने आपल्याच मालकाला खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कित्येक दिवसांपासून तो आपल्या मालकासोबत राहत होता. कित्येक दिवसांपासून उपाशी असल्याने त्याने मालकालाच खाण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांच्या तक्रारीवर पोलिस जेव्हा घरात धडकले, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. एका पाळीवर कुत्रा आपल्या मालकाच्या शेजारी बसून त्याचा चेहरा खात होता. 62 वर्षीय कॅनेडियन नागरिक ग्लेन पॅटिसन गेल्या काही वर्षांपासून पट्टाया येथे आपल्या कुत्र्यासोबत राहत होते. त्याच कुत्र्याने ग्लेन यांचे लचके तोडले आहेत.


रक्ताने माखला होता डॉगीचा चेहरा
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, प्रथमदृष्ट्या ग्लेन यांचा मृत्यू दोन आठवड्यांपूर्वीच झाल्याचे समजते. मालकाच्या मृत्यूनंतर श्वान 12 ते 13 दिवसांपासून घरात उपाशी कोंडला गेला होता. शेजाऱ्यांना 3 ते 4 दिवसांपासून कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज येत होते. त्यानंतर एकाने शनिवारी पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिस दार तोडून घरात घुसले तेव्हा श्वान मालकाच्या बाजूलाच बसला होता. तसेच त्याचे तोंड रक्ताने माखले होते. कॅनडाचे राहणारे ग्लेन दक्षिण पट्टाया येथील सत्ताहिप जिल्ह्यात राहत होते. 


इतक्या वाइट अवस्थेत सापडला मृतदेह
कूझो नावाच्या डॉगीने ग्लेन यांचा चेहरा पूर्णपणे खाल्ला होता. एवढेच नव्हे, तर त्यांची कवटी सुद्धा चावून खाल्ली होती. धडावर सुद्धा अनेक ठिकाणी लचके तोडण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, ग्लेन नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन घरी पोहोचले होते. त्यांच्या घरातील टेबलावर मधुमेहाच्या औषधी सुद्धा सापडल्या. ग्लेन यांच्या शेजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, ते गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी राहत होते. आपल्या डॉगीवर त्यांचे खूप प्रेम होते. त्या डॉगीशिवाय त्यांचा आपला कुणीच नव्हता. 


किमान 10 दिवसांपूर्वी झाला मृत्यू
पोलिस अधिकारी पसावट सिरीपन यांनी सांगितल्याप्रमाणे, ग्लेन यांच्या मृतदेहावर कपडे नव्हते. त्यांचा मृत्यू किमान 10 दिवसांपूर्वी झाला असावा. तेव्हापासूनच कुझो आपल्या मालकाच्या शेजारी बसला होता. इतके दिवस घरात खायला तर सोडाच प्यायला पाणी सुद्धा नव्हते. परंतु, मालकाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना घटनास्थळी भांडणाचे किंवा दरोड्याचे पुरावे सापडले नाहीत. तसेच ते घरात एकटेच होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...