आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 92 दिवस चालणार इतकेच पाणी, या देशात लागल्या पाण्यासाठी रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाउन - दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात फक्त 92 दिवस चालेल इतकेच पाणी शिल्लक आहे. पाण्याच्या कमतरतेने येथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर येथील पाण्याची पातळी 13.5% पर्यंत घसरण्याची भिती आहे. यानंतर घरांमध्ये पुरवठा केले जाणारे पाणी बंद केले जाईल. लोकांना सार्वजनिक ठिकाणी एका रांगेत उभे राहून पाणी भरावे लागणार आहे. 

 

200 केंद्रांवर मिळणार पाणी
- प्रशासनाने 21 एप्रिल रोजी झीरो डे घोषित केला आहे. या तारखेनंतर लोकांच्या घरात पाणी पुरवठा बंद होईल. 
- शहरात 200 केंद्र लागतील. त्याच केंद्रांवर जाऊन सर्वांना आप-आपल्या घरासाठी पाणी भरून घ्यावे लागणार आहे. 
- सध्या प्रत्येकाच्या घरात दररोज 87 लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. 21 एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फक्त 27 लिटर पाणी मिळणार आहे. 
- केपटाउनची लोकसंख्या 37 लाख आहे. लोक पाण्याची इतकी बचत करत आहेत, की ते फ्लश आणि अंघोळीसाठी सुद्धा पाणी वाया घालत नाही. त्यामुळे, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, पाण्याच्या टंचाईने असे झाले या महानगराचे हाल...

बातम्या आणखी आहेत...