आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Here Comes The Bride, Bride Groom Arrive Celebrities Attending Royal Wedding Of Prince Harry By Walking 3 KM, See Photos

PHOTOS: शाही विवाहात हॅरी-मेघनचा लुक; 3 किमी पायपीट करून पोहोचले Celebs

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या शाही राजघराण्याचे 5 वे वारसदार प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. यात मेघनच्या व्हाइट गाऊनने साऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचा लग्नविधी विन्डसर कासलमध्ये पार पडला. यावेळी प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम ऑफिशिअल ड्रेसकोडमध्ये होते. तर मेघन आपल्या आईसह व्हिन्टेज कार घेऊन पोहोचली. 

 

3 किमी पर्यंत सेलिब्रिटींची पायपीट
सेलिब्रिटीजचे सुद्धा आगमन सुरू होते. यात सर्वप्रथम ज्येष्ठ हॉलिवूड अॅक्टर जॉर्ज क्लूनी आपली गॉर्जिअस पत्नी अॅमल क्लूनीसोबत दिसून आले. यानंतर माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया हातात हात घेऊन विन्डसर कासलच्या दिशेने निघाले. यामध्येच जगप्रसिद्ध अँकर ऑप्रा विन्फ्रे आणि टेनिस स्टार सेरेना विल्यम्स हिचा देखील समावेश आहे. या सर्व सेलब्रिटीजला निमंत्रणातच सांगण्यात आले होते, की त्यांना कासल पर्यंत 3 किमी पायी जावे लागेल. त्यामुळे, चेक पॉइंटपासून कासलच्या मेन गेटपर्यंत सगळेच पायी जाताना दिसून आले. 

 

13 वर्षांपूर्वी याच ठिकाणी वडिलांचा दुसरा विवाह
शाही लग्नाचे सर्व विधींसाठी 101 वर्षांपूर्वी बांधलेल्या विन्डसर कासल चर्चची निवड करण्यात आली. 2005 मध्ये प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनी याच चर्चमध्ये कॅमिला पार्कर यांच्याशी दुसरा विवाह केला होता. 13 वर्षांनंतर त्याच ठिकाणी मुलाचा विवाह होत आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...