आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - सीरियात झालेला रासायनिक हल्ला नुकताच झालेला कथित रासायनिक हल्ल्यावरून अमेरिका सीरियावर लष्करी कारवाईची तयारी करत आहे. ब्रिटनसह इतर काही देश सुद्धा त्यामध्ये सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या रासायनिक शस्त्रांच्या मुद्यावरून जगातील दोन सर्वात शक्तीशाली राष्ट्र अमेरिका आणि रशिया समोरासमोर आले आहेत. याच रासायनिक शस्त्रांच्या आरोपांवरून अमेरिकेने अख्खा इराक उद्ध्वस्त केला. एवढेच नव्हे, तर इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैनला सुळावर चढवले. इराकमध्ये रासायनिक शस्त्रांचे सबळ पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. रासायनिक शस्त्रांना सर्वात घातक WMD (Weapon Of Mass Destruction) म्हणत युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेकडे सुद्धा रासायनिक शस्त्र आहेत. त्यांचाच आढावा आज आम्ही घेत आहोत.
पहिल्या महायुद्धात 5770 मॅट्रिक टन केमिकल वेपन्सची निर्मिती
- पहिल्या महायुद्धात अमेरिकेने रासायनिक शस्त्र निर्मिती आणि रिसर्चसाठी वेगळी शाखा स्थापित केली. या खास केमिकल वेपन्स कारखाने आणि प्रयोगशाळांमधून 5770 मॅट्रिक टन केमिकल वेपन्स तयार करण्यात आले. त्यामध्ये 14 मॅट्रिक टन फॉसजीन आणि 175 मॅट्रिक टन मस्टर्ड गॅसचा समावेश होता. 1917 मध्ये अमेरिकेने पहिले गॅस रेजिमेंट सुद्धा तयार केले. पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये असताना अमेरिकेच्या गॅस रेजिमेंटने अनेकवेळा फॉसफीनचा वापर केला.
- 1918 मध्ये अमेरिकेने आहायो येथे आणखी एक रासायनिक शस्त्रांचा कारखाना स्थापित केला. तसेच लेविसाइट नावाचा नवा केमिकल तयार केला. यानंतर 1922 मध्ये अमेरिकेने रासायनिक शस्त्र विरोधी शिखर संमेलनात सहभाग नोंदवला. पण, फ्रान्सच्या विरोधाने ती बैठक निष्फळ ठरली. यानंतर अमेरिकेने आपल्या केमिकल वेपन्समध्ये 30 हजार टनची वाढ केली.
दुसऱ्या महायुद्धात अशी होती परिस्थिती
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या सहकारी राष्ट्रांनी रासायनिक शस्त्रांचा थेट वापर टाळला. तरीही यात रासायनिक हल्ल्यांचे आरोप लागले. 2 डिसेंबर 1943 रोजी अमेरिकेच्या जहाजावर जर्मन लढाऊ विमानांनी हल्ले केले ते जहाज यूएसएस जॉन हार्वी मस्टर्ड गॅसने भरलेले होते. यात 69 जणांचा मृत्यू झाला असे अमेरिकेच्या लष्कराने सांगितले होते. पण, नुकसान कशा स्वरुपाचे होते किंवा नागरिकांची जीवित हानी काय होती ही आकडेवारी गुप्त ठेवण्यात आली.
व्हिएतनाम, कोरियावर फेकले ऑरेन्ज बॉम्ब
- 1955 ते 1975 पर्यंत 20 वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने रासायनिक हल्ले केले होते. उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये अख्खा जग विभागला गेला होता. उत्तर व्हिएतनामला सोव्हिएत, चीन आणि कम्युनिस्ट देशांचा पाठिंबा होता. तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिका आणि ब्रिटनसह सहकारी देशांचा पाठिंबा होता.
- कम्युनिस्ट आणि स्थानिक सैनिकांशी 20 वर्षे युद्ध करून अमेरिका आर्थिक आणि मानसिकरीत्या दमला होता. त्याचवेळी अमेरिकेने व्हिएतनामच्या सैनिक व नागरिकांना भिती दाखवण्यासाठी त्यांच्यावर ऑरेंज बॉम्बचा वापर केला होता. हे ऑरेंज बॉम्ब व्हिएतनाममध्ये ज्या-ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी अद्याप शेती आणि वृक्ष तर सोडाच काटे सुद्धा उगत नाहीत. युद्ध संपवून 4 पिढ्या गेल्या पण, त्या हल्ल्यातील पीडितांची आपत्ये अजुनही शारीरिक आणि मानसिकरीत्या विकृत जन्माला येत आहेत.
केमिकल वेपन्स नष्ट करण्याची आश्वासने हवेतच
- रशियाने 2017 मध्ये आपल्याकडील सर्व रासायनिक शस्त्र नष्ट झाली असून देश केमिकल वेपन्समुक्त झाल्याची घोषणा केली. पण, अमेरिकेने 1992 मध्ये दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही.
- 1922 पासून अमेरिका सातत्याने जगभरातील देशांना बोलावून केमिकल वेपन्स नष्ट करण्याचे प्रोग्राम राबवत आहे. त्या करारांवर देशांच्या स्वाक्षऱ्या घेत आहेत. पण, स्वतः स्वाक्षरी करण्यास टाळा-टाळ केली. अखेर 1993 मध्ये सीनिअर बुश प्रशासनाने केमिकल वेपन्स नष्ट करण्याची तयारी दाखवत करारांवर स्वाक्षरी केली.
- अमेरिकेने आपल्याकडील हजारो टन केमिकल वेपन्स 2012 पर्यंत नष्ट करण्याचे आश्वासन दिले. पण, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. यानंतर अमेरिकेने आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2023 चे उद्दिष्ट ठरवले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेच्या रासायनिक हल्ल्यांचे काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.