आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी Don होते नाव, शिक्षकाच्या कानाखाली लावली तेव्हा; मित्रांनी सांगितले किस्से...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्कहून DainikBhaskar.com...
अमेरिकेतील रिअल एस्टेटचा बादशहा म्हणूनही ओळखले जाणारे डोनाल्ड ट्रम्प 16 जून रोजी आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 'एके दिवशी मी प्रचंड लोकप्रिय होईल...असा माझा दावा नाही तर विश्वास आहे...कदाचित मी अमेरिकेचा अध्यक्षही बनेल.' असे वयाच्या 12 व्या वर्षी संतापाच्या भरात ट्रम्प आपल्या मित्राला म्हणाले होते. एवढेच काय तर, काही वर्षांपूर्वी एका रिपोर्टरने मुलाखतीमध्ये त्यांना विचारले होते, की आपल्याकडे अमाप संपत्ती आहे. पैसाच संपला तर आपण कराल? तेव्हा हसतमुखाने मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल असे ट्रम्प म्हणाले होते. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरली. 


बालपणी 'डॉन' नावाने होते प्रसिद्ध...
ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com आपल्या वाचकांना नेहमी बातम्यांच्या पुढे राहाण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खास माहिती घेऊन आले आहे. दरम्यान, 3 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या बालपणी 3 मित्रांशी संवाद साधला. बालपणी डोनाल्ड ट्रम्प डॉन नावाने फेमस होते. डॉनच्या तिन्ही शालेय आणि महाविद्यालयीन मित्रांसह 'अमीर बाप की बिगडैल औलाद' असे संबोधले जाणारे ट्रम्प यांची बहीण आणि मुलाशी चर्चा केली. त्यांनी ट्रम्प यांच्या लहानपणीचे एकापेक्षा एक किस्से सांगितले आहेत.

 

- कुणी सांगितले?
- कोण आहेत पॉल ऑनिस?
- फर्स्ट स्टँडर्ड ते ग्रॅज्युएशनपर्यंत ट्रम्प यांचे क्लासमेट होते. 

न्यूयॉर्क मिलिट्री अकादमीत ट्रम्प यांचे क्लासमेट राहिलेले पॉल ऑनिस यांनी सांगितले की, 'ट्रम्प यांना अपमान सहन होत नाही. एकदा ट्रम्प आणि ते टाईम्स स्केअरवर मूव्ही पाहाण्यासाठी गेले होते. दोघांचे मूव्ही तिकीट कुठे पडले. हॉलच्या चौकीदारने तिकीट मागितले. तिकीट नसल्याने त्याने दोघांना धक्का मारत बाहेर काढले.
- चौकीदाराने धक्का दिल्याने ट्रम्प जमिनीवर कोसळले. त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांना प्रचंड संतापही आला होता. ते उठले आणि चौकीदाराला धक्का देऊन तेथून पळून गेले होते. घरी पोहोचल्यानंतर ट्रम्प यांनी वडिलांना हा किस्सा सांगितला. ट्रम यांचे वडील फ्रेड हे त्या काळात मोठे रियल एस्टेट बिझनेसमन होते. 
- फ्रेड यांनी ट्रम्प यांना मिलिट्री अकादमीत अॅडमिशन घेण्याचा निर्णय घेतला. पण, ट्रम्प यांनी एक अट ठेवले होती. ती म्हणजे, टाईम्स स्केअरवरील 'ती' बिल्डिंग खरेदी करून देण्याची. या बिल्डिंगच्या चौकीदाराने ट्रम्प यांना अपमानीत केले होते. फ्रेड यांनी प्रॉपर्टी डिलिंग 2-3 दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण, ट्रम्प यांच्या हट्टापुढे त्यांचे एक चालले नाही. फ्रेड यांनी संपूर्ण बिल्डिंग खरेदी केली.


चला तर मग, जाणून घेऊन या अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्षांविषयी 10 रोचक फॅक्ट्‍स. ते तुम्ही यापूर्वी कुठेच वाचले नसावेत.

 

पुढे... आमचे प्रतिनिधी रोहिताश्व कृष्ण मिश्रा आणि न्यूयॉर्कचे आरिफ जमाल यांचा स्पेशल रिपोर्ट...

बातम्या आणखी आहेत...