आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लेबनानमध्ये महिला पोलिस परिधान करतात शॉर्ट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रॉमाना - लेबनानच्या ब्रॉमानाशहरात सध्या महिला ट्राफिक पोलिसांच्या ड्रेसवरून चांगलाच गदारोळ होतोय. शहराचे महापौर पियरे एचकर यांनी उन्हाळ्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महिला पोलिसांचा गणवेश बदलला आहे. नव्या युनिफॉर्ममध्ये आता महिलांना ब्लॅक मिनी शॉर्ट्स आणि रेड कॅप परिधान करावी लागेल. महापौरांनी सांगितले की, देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. दुसरीकडे सोशल मीडियावर काही जणांना यावर आक्षेप नोंदवलाय. 


99% पर्यटकांना शॉर्ट्स परिधान करणे आवडते 
- सोशल मीडियावर महापौरांच्या या निर्णयावर टीका होतेय. लोकांचे म्हणणे आहे की, महापौरांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चुकीची पद्धत निवडली आङे. जर असे असेल तर पुरुष सहकाऱ्यांच्या गणवेशात का बदल करण्यात आला नाही?
- दुसरीकडे महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना हा नवा बदल आवडत आहे. त्या सर्व जॉब एन्जॉय करत असल्याचे सांगण्यात आले. देशात येणाऱ्या पर्यटकांपैकी 99 टक्के पर्यटकांना शॉर्ट्स परिधान करायला आवडते. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...