आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले; ‘जा, मतदान करा; प्रवास खर्च देऊ’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - मलेशियात ९ मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. बुधवारी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच सोशल मीडिया आणि रस्त्यांवर निदर्शने सुरू झाली. त्याचे कारण म्हणजे २० वर्षांत प्रथमच वीकेंडऐवजी बुधवारी निवडणूक ठेवली होती आणि सुटीची घोषणाही करण्यात आली नव्हती. त्यानंतर सोशल मीडियावर ‘गो होम टू व्होट’ ट्रेंड सुरू झाला.

 

अनेक खासगी कंपन्यांनी सुटीची घोषणा केली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, तुम्हाला मतदानासाठी घरी जाण्यास सुटी दिली जात आहे. जा, मतदान करा. तुमच्या प्रवासाचा खर्च सरकारच देईल. या मोहिमेचा परिणामही झाला आणि सरकारला अखेर मतदानाच्या दिवशी सुटीची घोषणा करावी लागली.


दुसरीकडे सोशल मीडियावरही लोक गरजू लोकांना विमानापासून ते शेअर टॅक्सीपर्यंत ऑफर करत आहेत. अशा लोकांनी ट्विटरवर म्हटले की, मत देणे तुमचा हक्क आहे. तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. गरजूंनी घरी जाण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांच्या प्रवासाचा खर्च आम्ही सर्व जण मिळून करू. गरजू लोकांना घरी पाठवण्यासाठी अनेक संघटना आणि लोक पुढे आले आहेत.

 

नजीब यांच्यासमोर गुरूचे आव्हान
मलेशियात २२२ संसदीय आणि ५८७ राज्य जागांसाठी नामांकन २८ एप्रिलला होईल. एकूण १,४४,९०,६२७ मतदार आहेत. नजीब नऊ वर्षांपासून सत्तेत आहेत. नजीब यांच्यासमोर त्यांचे राजकीय गुरू आणि माजी पंतप्रधान महाथीर मोहंमद आहेत. महाथीर ९२ वर्षांचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...