आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाचे नुकसान: स्वार्थी, आत्मकेंद्रीत होतात योगा करणारे; ब्रिटिश विद्यापीठाचे संशोधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - योगा आणि ध्यान केल्याचे फायदे आपण ऐकलेच असतील. तन आणि मनासाठी या दोन गोष्टींचे फायदे हजारो वर्षांपासून सांगितले जात आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकांनी योगाचे महत्व लक्षात घेतले. त्यामुळेच, भारत सरकारच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रकडून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर करण्यात आला. परंतु, याच योगामुळे नुकसान होत असल्याचा दावा ब्रिटिश विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या मते, योगा आणि ध्यान करणारी माणसं अधिक गर्विष्ठ, स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत होतात. त्यांना आपल्या विषयी बोलण्यापेक्षा दुसरे काहीच सूचत नाही. 


असे झाले संशोधन...
- ब्रिटनच्या साउथॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांनी योगा शिकणाऱ्या 93 विद्यार्थ्यांचा 15 आठवड्यांसाठी अभ्यास केला आहे. 
- प्राचीन योगा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये, योगा केल्यानंतर आपण किती वेळा "मी एकेदिवशी महान कार्यांसाठी ओळखला जाईल, मी खूप मोठे कार्य करेन." अशा वाक्यांचा प्रयोग केला अशी विचारणा करण्यात आली.
- यासोबतच सोबत मी स्वतःचा खूप आदर करतो माझी प्रतिष्ठा आहे अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा वर्गीकरण करण्यात आले. 
- दुसऱ्या टप्प्यात संशोधकांनी ध्यान साधना करणाऱ्या 162 विद्यार्थ्यांचा फेसबूकच्या माध्यमातून 4 आठवड्यांपर्यंत बारकाइने अभ्यास केला. यात ध्यान करणाऱ्यांना अभ्यास सहभागी झालेल्या इतरांच्या तुलनेत मी पक्षपाती नाही ना? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्या संशोधकांचे रिसर्च 'सायकोलॉजिकल सायन्स' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...