आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग यांच्‍यात ऐतिहासिक भेट, जगात शांतता प्रस्‍थापित करण्‍याबाबत चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - जगातील दोन सर्वात मोठ्या शत्रुराष्ट्रांनी आज प्रथमच मैत्रीचा हात पुढे केला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्यात सिंगापूरमधील सँटास बेटावरील कपॅला हॉटेलमध्ये शिखर बैठक सुरू आहे. यांदरम्‍यान जगात शांतता प्रस्‍थापित करण्‍याविषयी उभय नेत्‍यांमध्‍ये चर्चा होणार आहे. त्यांच्यासोबत एक-एक दुभाषीही आहे. ही भेट जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा शांततेचा पुढाकार मानला जात आहे.

 

दोन्ही देशांत ७० वर्षांपासून संबंध नाहीत. दोन्ही देशांचे सर्वाेच्च नेते पहिल्यांदाच भेटत आहे. ट्रम्प आपल्या ७२ व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी जगास शांततेचा संदेश देतील. ते १४ जून रोजी ७२ वर्षांचे होतील. सोमवारी सिंगापूरचे पंतप्रधान सीन लुुंग यांनी ट्रम्प यांच्या हातून वाढदिवसाचा केकही कापला. सध्या जगभरात किम जोंग व डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचीच सर्वाधिक चर्चा आहे.    

 

> ट्रम्प- किम चर्चेतील ३ मोठे मुद्दे

1) ट्रम्पना मिळू शकतो शांततेचा नोबेल पुरस्कार   
तीन महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी किमसोबत चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून त्यांचे समर्थक ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार द्यावयास हवा, असे म्हणत आहेत. किम व ट्रम्प यांची चर्चा यशस्वी ठरल्यास ट्रम्प नोबेल प्राप्त करू शकतात.    

 

2) अमेरिका, उ.कोरियावरील निर्बंध हटवू शकतो   
किम अणू नि:शस्त्रीकरणाच्या दिशेने पुढे आल्यास ट्रम्प यांचा विजय होईल. यानंतर अमेरिका, उ. कोरियासमोर नि:शस्त्रीकरणाची अट ठेवून आर्थिक निर्बंध हटवू शकतो. द. कोरियामधील आपल्या २ हजार सैनिकांना परत बोलावू शकतो.   

 

3) सर्वात शक्तिशाली देश, सर्वात दुबळ्याला भेटणार   
अमेरिकेचा जगातील एकूण जीडीपीत १६ ते १७ टक्के वाटा. अमेरिकेचा जीडीपी १८.५७ लाख कोटी डॉलर आहे. ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. उत्तर कोरियाचा एकूण जीडीपी २८.५ अब्ज डॉलर आहे. जीडीपीच्या हिशेबाने जगातील अव्वल १२५ देशांमध्ये ते ९६ व्या क्रमांकावर आहेत. उ.कोरियाच्या जीडीपीचा जागतिक अर्थव्यवस्थेत २% वाटा आहे. 

 

उ. कोरियाचा अजेंडा: ही अमेरिकेशी संबंध सुधारण्याची केवळ सुरुवात

उ. कोरियाचे सरकारी वृत्तपत्र रोडोंग सिनसूनने संपादकीयमध्ये लिहिले की, प्योंगयांग अमेरिकेसोबत आपले संबंध सुधारण्याच्या दिशेने काम करेल. आमचे कोणत्या देशासोबत संबंध भलेही वाईट होत असतील, मात्र तो देश आमच्या स्वातंत्र्याचा आदर करत असेल तर आम्हीही त्यांच्याशी चर्चेद्वारे संबंध कायम ठेवण्यावर विश्वास ठेवतो. सरकारी वृत्तसंस्था केसीएनएने सांगितले की, दोन्ही देशांतील नेते कोरियाई बेटावर दीर्घकालीन शांतता प्रक्रियेसाठी चर्चा करतील.   

 

ट्रम्प-किम यांच्या भेटीच्या ठिकाणी मिनी इंडिया वसाहत   
- ट्रम्प व किम यांच्यात सँटोसा बेटावर चर्चा होत आहे. तिथे सिंगापूरचा दोन किमी परिसरात छोटा भारत वसला आहे.   
- येथे भारतीयांची शेकडो घरे व दुकाने आहेत. येथे भारतीय बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची विक्री होते. दोन किमी क्षेत्रात ३०० भारतीय रेस्तराँ आहेत.   

 

७ वर्षांत ८९ क्षेपणास्त्र चाचणी करणारे किम करणार चर्चा   
- उ. कोरियाने ३३ वर्षांमध्ये १५० क्षेपणास्त्र चाचण्या व ६ अणुचाचण्या केल्या. ८९ क्षेपणास्त्रे व ६ अणुचाचण्या किम यांनी ७ वर्षांत केल्या आहेत.   
- १९५० ते १९५३ पर्यंत चाललेल्या कोरियाई युद्धानंतर उ.कोरिया व अमेरिकेतील चर्चा बंद आहे.

 

पुढील स्‍लाइडवर... अमेरिकेचा ४६ वर्षांत ५ व्यांदा आपल्या सर्वात मोठ्या विरोधक देशाशी शांततेसाठी पुढाकार..

 

हेही वाचा,

ट्रम्प यांची खरी कसोटी!

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...