आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराढाका- दोनदा पंतप्रधान राहिलेल्या आणि मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) प्रमुख खालिदा झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा सुनावल्याने बांगलादेशच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. खालिदा आता सार्वत्रिक निवडणूक लढवू शकणार नाहीत. खालिदांसोबत त्यांचा मुलगा तारिक रहमान यालाही शिक्षा झाल्याने बीएनपी नेतृत्वविहीन झाली आहे. त्याचा फायदा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना मिळणार हे निश्चित आहे. देशात डिसेंबरमध्ये निवडणूक होत आहे. हसीना या खालिदांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप खालिदांचे समर्थक रुहुल कबीर रुब्जी यांनी केला आहे.
अशा अडकल्या खालिदा
ढाका हायकोर्टाने १९ मार्च २०१४ ला कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले होते. निकालात झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवले होते. झिया यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने गुन्हा दाखल केला होता. झियांचा चॅरिटेबल ट्रस्ट कागदांवर चालतो. त्यात १.६३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप होता. तेव्हा झिया पंतप्रधान होत्या.
आरोप : ३५०० बीएनपी कार्यकर्त्यांना केली अटक
खालिदांना शिक्षा दिल्यानंतर बांगलादेशात तणावाची स्थिती आहे. बीएनपी नेते आणि झिया समर्थकांनी ढाकासहित अनेक ठिकाणी निदर्शने केली. पोलिसांनी काही दिवसांत झियांच्या ३५०० समर्थकांना अटक केली, असा बीएनपीचा आरोप आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक हजार दंगेखोरांना अटक केली आहे. शुक्रवार सकाळपर्यंत जमावबंदीचा आदेश आहे.
२००८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता
खालिदा झिया, त्यांचा मुलगा तारिक रेहमान आणि इतर चौघांविरुद्ध झिया ऑर्फनेज ट्रस्टच्या निधीत घोटाळा केल्याच्या आरोपावरून २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. ढाका कोर्टात हा खटला सुरू होता. त्याच प्रकरणी खालिदांना दोषी ठरवण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही
भ्रष्टाचाराच्या आरोपांतून मुक्ततेसाठी झिया ३० नोव्हेंबर २०१४ ला सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणापासून स्वत:ला वेगळे करत झियांना कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले होते.
झियांचा पक्ष पाकच्या बाजूने
१९७१ मध्ये बांगलादेश बनवण्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. अवामी लीगचे नेते नेहमी भारताच्या बाजूने तर बीएनपीचे नेते पाकिस्तान आणि इस्लामिक देशांकडे झुकलेले आहेत.
बांगलादेशचे प्रमुख पक्ष
- बांगलादेश अवामी लीग : शेख हसीना (पंतप्रधान आहेत.)
- बीएनपी : खालिदांकडे नेतृत्व, इस्लामिकच्या बाजूने.
- जमात-ए-इस्लामी (कोर्टाच्या आदेशामुळे बंदी)
- जातीय पार्टी : कम्युनिस्ट पार्टी ऑफ बांगलादेश.
पंतप्रधानांनी दिली वॉर्निंग
- पंतप्रधान शेख हसीना यांनी इशारा दिला आहे, की बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा प्रयत्न केला तर सत्ताधारी आवामी लीगचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीसाठी तयार राहातील.
बीएनपीचा आरोप - निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र
- बीएनपीचा आरोप आहे की खालिदा यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी आवामी लीगने हे त्यांच्याविरोधात रचलेले षडयंत्र आहे. या निर्णयाच्याविरोधात बीएनपी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.