आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: साप आणि मगरीत युद्ध पेटते तेव्हा; श्रीलंकेतील चित्तथरारक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

याला - ही छायाचित्रे श्रीलंकेतील याला राष्ट्रीय अभयारण्यात घडलेल्या संघर्षाची आहेत. यात साप आणि मगर यांच्यात जगण्या-मरण्याचा संघर्ष दिसून येतो. श्रीलंकेतील फोटोग्राफर आणि पेटन्ट टेक्नोलॉजी स्पेशालिस्ट रिशानी गुणसिंघे यांनी ही छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. सुरुवातीला सापाचा आकार पाहून हा एक अजगर असेल असा       भास रिशानी यांना झाला. काही वेळातच तो अजगर नसून एक विशालकाय 'रसेल स्नेक' असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीपासून फाइटच्या अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत त्यांनी या क्षणाचे फोटो टिपले आहेत. 


> रिशानी गुणसिंघे आपल्या मित्रांसोबत जीपमधून सैर करत होते. त्याचवेळी त्यांना एक मगर झटापट करताना दिसून आली. श्रीलंकेत मगरींची संख्या अधिक असल्याने त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. तेवढ्यात मगरने पाण्यातून एक विशालकाय साप टॉस करून पाण्यासह हवेत फेकला. तेव्हा रिशानी यांनी वेळीच आपला कॅमेरा काढून फोटो घेण्यास सुरुवात केली. 
> सापाचा आकार मोठा असला तरीही तो एक अजगर नसून रसेल स्नेक होता. साप आणि मगरीच्या संघर्षाचा हा एक अतिशय दुर्मिळ क्षण होता. तलावाच्या अगदी जवळ जाऊन रिश यांनी संपूर्ण संघर्ष आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. 
> सापाचा आकार पाहता त्याचेच पारडे जड दिसत होते. परंतु, मगरीने आपल्या जबरदस्त जबड्यांचा वापर सापाचे नरडे पकडले. सापाला दाताखाली घेत फिरक्या घेतल्या. मगरीची पकड इतकी मजबूत होती की त्या सापाचा मृत्यू झाला. 
> श्रीलंकेत सर्प दंशांमुळे सर्वाधिक मृत्यूच्या नोंदी रसेल स्नेकच्या चाव्याने झाल्या आहेत. हे श्रीलंकेतील दुसरे सर्वात विषारी सर्प आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या संघर्षाचे आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...