आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - इस्रायलचे पंतप्रधान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. सपत्निक भारतात आलेले बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतासोबत विविध महत्वाचे करार केले. यात इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि भारताचे गुप्तचर विभाग रॉ मध्ये झालेल्या कराराचा देखील समावेश आहे. मोसादला जगातील सर्वात घातक गुप्तचर संस्था असेही म्हटले जाते. या गुप्तचर संस्थेच्या कामगिरीच्या जगभरात चर्चा आहेत. त्यापैकीच काही मोजक्या कामगारींची माहिती आम्ही देत आहोत.
बनावट पासपोर्टवर दुबईत घुसून शत्रूंना ठार मारले
- पॅलेस्टीनी बंडखोर संघटना हमासचा नेता महमूद अल-मबूह इस्रायलमध्ये हल्ल्यांचा आरोपी होता. या व्यतिरिक्त हमाससाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्याचेही त्याच्यावर आरोप होते. त्यामुळे, मोसादच्या शत्रूंच्या यादीत तो सर्वात वर होता.
- मोसाद आपल्या मागे लागल्याची माहिती मिळताच मबूह दुबईत जाऊन लपला. मोसादला याची माहिती वेळीच मिळाली. जानेवारीत दुबईचे हवामान चांगले राहत असल्याने मोसादने याच महिन्याचा कालावधी निवडला. या महिन्यात मोठ्या संख्येने पर्यटक दुबईला जातात. त्याचा फायदा घेत मोसादने बनावट पासपोर्टने दुबईत एंट्री घेतली.
- दुबईच्या हॉटेल बुस्ताना रोतानामध्ये 19 जानेवारी 2010 रोजी मोसादच्या कमांडोझने मबूहला इतक्या चलाखीने ठार मारले. की दुबई पोलिसांना तो अपघातच वाटला होता. कित्येक आठवडे ते या प्रकरणाचा तपास करत होते.
- पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याला विषचे इंजेक्शन दिल्याचे स्पष्ट झाले होते. याच विषमुळे त्याला ब्रेन हॅमरेज झाले आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर मोसादने हे काम करण्यासाठी 33 एजंट लावल्याचाही खुलासा झाला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या आणखी काही चर्चित मोहिमा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.