आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातांनी फाडून केले जातात जनावरांचे तुकडे, 900 वर्षांची अनिष्ट परमपरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्रत्येक देश, समाज आणि समुदायात उत्सव साजरा करण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येकाची आनंद साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. अनेकवेळा काही समुदायांमध्ये आनंद साजरा करण्याची पद्धत दुसऱ्या समुदायाला किंवा समाजाला अनिष्ट वाटू शकते. काही लोक अशा परमपरांना क्रूर देखील संबोधतात. त्यापैकीच एक परमपरा आहे नेपाळच्या देवपोखरी फेस्टिव्हलची. गेल्या 9 शतकांपासून तलावात बकऱ्या फेकण्याची ही प्रथा सुरू आहे. तलावात बकरी फेकतात लोक तिला मारण्यासाठी अक्षरशः तुटून पडतात. जाणून घेऊयात काय आहे हा उत्सव...

 

- काठमंडी घाटाजवळ खोकन गावात नेवारी समुदायाचे लोक अशा प्रकारचे उत्सव साजरा करतात. यात जनावरांचा बळी देण्याची परमपरा आहे. 
- येथे सुद्धा बकरी मारल्या जातात. पण, त्यांना मारण्याची पद्धत अतिशय क्रूर पद्धतींपैकी एक असल्याने बाहेरचा समाज त्यावर टीका करतो. 
- गावातील रूद्रायणी मंदिर परिसरात 5 ते 6 महिन्यांची एखादी जिवंत बकरी फेकली जाते. तिच्यासोबतच 8 ते 9 युवक सुद्धा तलावात उडी घेतात आणि सुरू होतो मृत्यूचा खेळ...
- सर्वच युवक एकमेकांना दूर ढकलून ती बकरी पकडण्याचा प्रयत्न करतात आणि तिला ओढण्यासाठी झटापट सुरू होते.
- कुणी तिचा पाय धरतो तर कुणी शेपूट आणि कुणी मुंडके... ती वेदनेने मरत नाही किंवा तिचे तुकडे होत नाही तोपर्यंत तिला ओढण्याचे काम सुरू असते. सोबतच इतरांचा डान्स सुरू असतो. यानंतर तिच्या मटणापासून विविध प्रकारच्या डिश बनवल्या जातात. 

 

प्राणी मित्रांकडून होतोय विरोध
ऑर्गेनाइझेशन फॉर अॅनिमल वेलफेअर नेटवर्क नेपाळ या फेस्टिव्हलच्या विरोधात आहे. त्यांनी या विरोधात मोहिम सुद्धा राबवली. अशा प्रकारे जनावरांची कत्तल क्रूरता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संघटनेला जागतिक संघटना PETA देखील सहकार्य करत आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या अनिष्ट परमपरेचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...