आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंस्टाग्रामने हटवले चिमुकलीचे हे PHOTOS, सांगितले असले फालतू कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडिया इंस्ट्राग्रामने आपल्या मुलीचा पोस्ट केलेला फोटो हटवल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. जॉर्डन ली नावाच्या या महिलिने आपल्या 2 वर्षांच्या चिमुरडीचा बीचवर मस्ती करताना एक फोटो पोस्ट केला होता. मात्र, इंस्टाग्रामने हा फोटो काढूनच टाकला. काही यूझर्सनी त्या मुलीच्या स्किन संदर्भात तक्रार केली होती. त्यामुळे, हा निर्णय घेतला असे कारण इंस्टाग्रामने दिले आहे. 

 

- ली हिने आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नकारात्मक कॉमेंट येण्यास सुरुवात झाली. लोकांनी तिच्या मुलीचा फोटो अतिशय घाणेरडा असल्याचे म्हटले. काहींनी तुला सनस्क्रीनबद्दल माहिती नाही का असले प्रश्न विचारले. 
- लीने सांगितल्याप्रमाणे, ट्रोल करणाऱ्यांपैकी काहींनी तर अशाही कॉमेंट केल्या, की तुझी मुलगी वयाच्या चौथ्या वर्षीच 40 वर्षांची दिसेल. तेव्हा तू सनस्क्रीन लावणार का? 
- एवढेच नव्हे, तर या फोटोवरून इंस्टाग्रामला अनेकांनी तक्रारी दाखल केल्या. तसेच हा फोटो सोशल मीडियावरून हटवण्याची मागणी केली.
- यानंतर तिने एक फोटो पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावर लोकांना सांगितले की या मुलीला तिचा रंग आई आणि वडिलांमुळे मिळाला. आई-वडिल अॅबोरिजीनी असल्याने तिचा रंग नैसर्गिकरीत्या तसाच आहे. 
- लीने आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना सांगितले, की मी रोबोट नाही. मलाही भावना आहेत. अशा प्रकारचे कॉमेंट्स मला सहन होत नाहीत. 
- नाराज ली हिने आपल्या मुलीचा फोटो हटवण्याबद्दल इंस्टाग्रामला सुद्धा जाब विचारला आहे. मात्र, सोशल मीडियाकडून त्याचे उत्तर आलेले नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लीने शेअर केले आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...