आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे कचऱ्यात भाकर शोधून पोट भरतात लोक, जगण्यापेक्षा मरण सोपे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - येमेनमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी आणि युद्धांमुळे लोकांचा आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. लोकांची घरे तर गेलीच आता भटकताना उपासमारीची वेळ आली आहे. पोटात काहीही टाकून जगण्याचा संघर्ष करणारे लोक कचऱ्यात जेवण शोधत आहेत. याच कचऱ्यातून मिळालेल्या सडलेल्या भाज्या आणि फळे खात ते आपल्या पोटाची आग शमविण्याचा प्रयत्न करत आहेत. यूएनच्या एका अहवालानुसार, गृहयुद्ध आणि संघर्षात येमेनचे 18 लाख नागरिक बेघर होऊन भटकत आहेत. 

 

- नॉर्थ-वेस्ट येमेनमध्ये राहणाऱ्या रुजॅक आणि त्याच्या कुटुंबियांना यादवीमुळे गाव सोडावे लागले. सौदीच्या हवाई हल्ल्यात त्याचे घर उद्ध्वस्त झाले. 
- काही दिवस एका नातेवाईकाकडे राहून त्याने दिवस काढले. पण, त्या नातेवाइकाकडे सुद्धा खाऊ घालण्यासाठी काहीच नसल्याने रुजॅकने ते घर सुद्धा सोडले. 
- सध्या रुजॅक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य विविध ठिकाणी कचऱ्याचे डबे चाळून त्यात मिळेल ते खायला विवश आहेत. 
- त्याच्याच कुटुंबातील 11 वर्षीय सदस्याने सांगितल्याप्रमाणे, दररोज कचऱ्याचे डबे आणि ढीग खांगाळताना नासलेल्या भाज्या, मांस आणि कांदा बटाटे सापडतात. तेच दिवसभर आम्ही गोळा करत राहतो. 
- याच कचऱ्यातून मिळणाऱ्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यातून प्रति किलो त्यांना फक्त 0.19 पैसे मिळतात. अर्थात त्यांनी शंभर किलो प्लास्टिक जमा केल्यास त्यांना फक्त 10 रुपये मिळेल. यापूर्वी त्यांना 1 किलो प्लास्टिकसाठी 7 रुपये दिले जात होते.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या लोकांचे हाल दाखवणारे आणखी काही फोटोज...