आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असेल डोनाल्ड ट्रम्प यांची अंतराळ सेना; सोशल मीडियावर झाले Troll

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळात सैन्य दल स्थापित करत असल्याची घोषणा केली आहे. संरक्षण मुख्यालय पेंटागॉनला यासंदर्भातील आदेश दिले आहेत असे ट्रम्प यांनी सोमवारी राष्ट्रीय अंतराळ संशोधन परिषदेच्या भाषणात जाहीर केले आहे. अमेरिकेत यूएस आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, मरीन्स आणि कोस्टगार्ड असे पाच दल आहेत. पेंटागॉनच्या अधिपत्याखाली स्पेस फोर्स सहावा दल असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या घोषणेला सोशल मीडियाने मात्र हसण्यावर नेले. अनेकांनी फनी फोटो ट्वीट करून ट्रम्प यांच्या प्लॅनची खिल्ली उडवली. ट्रम्प सुद्धा एक एलियन आहेत असे लोक म्हणत आहेत.

 

"आपल्यासारख्यांना बोलावण्यासाठीच स्पेस फोर्स!"
सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या स्पेस फोर्स संकल्पनेला #TrumpSpaceForce या हॅशटॅगसह ट्रोल केले जात आहे. काहींनी ट्रम्प यांच्यावर हॉलिवूड चित्रपट जास्त पाहण्याचा परिणाम झाला असे म्हटले. तर काहींनी स्पेस अॅडव्हेंचर ET, Star Wars सिरीझ अशा चित्रपटांचे पोस्टर एडिट करून तेथे ट्रम्प यांचे चेहरे लावले. काहींनी तर चक्क अंतराळातील रॉकेटवर ट्रम्प बांधून उडवले आहे. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न केला आहे. एकाने तर ट्रम्प हे स्वतः परग्रही आहेत आणि आपल्या सारख्या इतरांचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्पेस फोर्सची घोषणा केली असे म्हटले आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रम्प यांच्या स्पेस फोर्स घोषणेनंतर ट्वीट करण्यात आलेले फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...